Sp sandip patil warns mafia | Sarkarnama

SP संदीप पाटील देणार मोक्काचा तडाखा : लॅंड आणि माथाडी माफियांना इशारा!

जनार्दन दांडगे
रविवार, 19 ऑगस्ट 2018

पुणे : पुणे जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी माथाडी आणि लॅंड माफियांना इशारा दिला असून, अशांना मोक्का लावणार असल्याचे जाहीर केले आहे. तसेच कायदा व सुव्यवस्थेला धोका निर्माण करणआऱ्यांना तडीपारीचे शस्त्र उगारणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पुणे : पुणे जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी माथाडी आणि लॅंड माफियांना इशारा दिला असून, अशांना मोक्का लावणार असल्याचे जाहीर केले आहे. तसेच कायदा व सुव्यवस्थेला धोका निर्माण करणआऱ्यांना तडीपारीचे शस्त्र उगारणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पुण्यात नियुक्ती होण्यापूर्वी पाटील हे सातारा जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक होते. तेथील गुन्हेगारी व भाईगिरी मोडुन काढण्यासाठी मोक्का या कायद्याचा प्रभावी वापर केला होता. पुणे जिल्हातील माफियागिरी मोडुन काढण्यासाठी वेळ पडली तर शंभरहून अधिक टोळ्यांच्यावर मोक्का लावण्यासही मागेपुढे पाहणार नाही, असेही संदीप पाटील यांनी सरकारनामाशी बोलताना सांगितले. 

पाटील यांनी पदभार अधीक्षकपदाचा कार्यभार स्वीकारून कांही तासांचा कालावधी उलटत असतानाच, सकल मराठा मोर्चाने चाकन परीसरात पुकारलेल्या बंदला हिंसक वळण मिळाले. यात शंभरहुन अघिक वाहने जळाली. 30 जुलैच्या पार्श्वभूमिवर नऊ ऑगस्टचा बंद शांततेत पार पडावा यासाठी पाटील यांनी जिल्हातील आजी-माजी आमदार, विविध पक्षाचे पदाधिकारी, पोलिस पाटील, पोलिस दलातील वरीष्ठ पोलिस अधिकारी व कर्मचार्यांच्याबरोबर थेठ संवाद साधुन नऊ ऑगस्टचा बंद शांततेत पार पाडला. यानंतर सरकारनामाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सविस्तर मते मांडली.

सातारा जिल्ह्याच्या तुलनेत पुणे जिल्हात औद्योगिक वसाहती व महामार्गाची संख्या अधिक आहे. यामुळे साहजिक गुन्हेगारीचे प्रमाणही अधिक आहे. अधीक्षक म्हणुन सूत्रे स्वीकारल्यानंतर जिल्ह्याची सखोल माहिती घेतली असता, ओद्योगिक वसाहतींमध्ये माथाडीवरुन गुन्हेगारी अधिक वाढल्याची माहिती मिळाली आहे. तर दुसरीकडे इतर जिल्ह्याच्या तुलेनेत पुणे परिसरात जमिनीचे दर अधिक असल्याने, लॅन्ड माफिया व खाजगी सावकार मोठ्या प्रमानात सक्रीय असल्याची माहिती मिळाली आहे.

जिल्हातील सर्व पोलिस अधिकाऱ्यांना आपआपल्या हद्दीतील माथाडी कामगार संघटना, त्यांचे म्होरके, बेकायदा वाळू माफिया, लॅन्ड माफिया व खाजगी सावकारांची व लोकल दादा व त्यांच्या सध्याच्या हालचाली यांची पूर्ण माहिती अधीक्षक कार्यालयाला तात्काळ देण्याच्या सूचना दिल्या आहेत. गुन्हेगारी पूर्णपणे मोडुन काढण्यासाठी शंभरहुन अधिक मोक्का लावावे लागले तरी मागेपुढे पहाणार नाही असा इशाराही पाटील यांनी यावेळी दिला.

अधिकाऱ्यांना आपापल्या हद्दीतील सर्व प्रकारचे अवैध धंदे व बेकायदा प्रवाशी वाहतूक बंद करण्याच्या सूचना देण्यात येणार आहेत. तर दुसरीकडे अवैध धंदे व बेकायदा प्रवाशी वहातुक, गुटखा विक्री सारख्या सर्व प्रकारच्या बेकायदा धंद्यांवर कारवाई करण्यासाठी अधिक्षक कार्यालयीन पातळीवर विशेष पथकाची निर्मिती करण्यात येणार आहे. संबधित बेकायदा धंदा ज्या पोलिस बीट अधिकाऱ्याच्या कक्षेत असेल, त्या संबधित अधिकाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख