दक्षिण नागपूरमध्ये परिवर्तन अटळ - प्रमोद मानमोडे

सरकारच्या दुर्लक्षित धोरणाने दक्षिण नागपूरचा विकास रखडला आहे. अनेक वसाहतींना बकाल स्वरूप आले आहे. यामुळे राजकीय पक्षांना ठिकठिकाणी विरोध होत आहे. दक्षिणेत जबरदस्त परिवर्तन घडवायचेच, असा जनतेचा निर्धार आहे. जनतेचे प्रेमच मला तारणार असल्याचा विश्‍वास निर्मल समूहाचे संस्थापक प्रमोद मानमोडे यांनी व्यक्त केला.
दक्षिण नागपूरमध्ये परिवर्तन अटळ - प्रमोद मानमोडे

नागपूर : सरकारच्या दुर्लक्षित धोरणाने दक्षिण नागपूरचा विकास रखडला आहे. अनेक वसाहतींना बकाल स्वरूप आले आहे. यामुळे राजकीय पक्षांना ठिकठिकाणी विरोध होत आहे. दक्षिणेत जबरदस्त परिवर्तन घडवायचेच, असा जनतेचा निर्धार आहे. जनतेचे प्रेमच मला तारणार असल्याचा विश्‍वास निर्मल समूहाचे संस्थापक प्रमोद मानमोडे यांनी व्यक्त केला.

प्रमोद मानमोडे यांनी मंगळवारी म्हाळगीनगर चौकातील प्रचार कार्यालयापासून पदयात्रा काढून मतदारांशी संवाद साधला. म्हाळगीनगर, महात्मा गांधीनगर, अष्टविनायक कॉलनी, राधाकृष्ण कॉलनी, जलकुंभ परिसर, बांते ले-आउट, सन्मार्गनगर, भाग्यश्रीनगर, संजय गांधीनगर, नेहरूनगर अशा सर्वच भागांतील मतदारांकडून मानमोडे यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ठिकठिकाणी मतदारांनी पुष्पहार घालून त्यांचे स्वागत केले. 

दक्षिण नागपुरातील समस्या सोडविण्यावर आपला भर असेल. नागरिकांना अपेक्षेनुसार मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलवून दाखणार. रोजगार, तंत्रशिक्षण आणि आरोग्यावर विशेष भर देऊन दक्षिण नागपूरला सुखी, संपन्न करू अशी ग्वाही त्यांनी दिली. यापूर्वीचे लोकप्रतिनिधी आणि प्रस्थापित राजकीय पक्षाविरोधातील असंतोष परिवर्तन घडवून आणणार असल्याचा दावा त्यांनी केला. 

पदयात्रेत धनराज महाले, सुधाकर काळे, उमेश ठाकूर, मधुकर फलके, पुरुषोत्तम आदमने, सुभाष देशमुख, दीपक अहीरकर, मंजूर अन्सारी, इसाक मन्सुरी, सुरेश भुंजे, प्रभाकर चौधरी, अमित अहीरकर, श्रीराम तरटे, मनोहर चुरड, अतुल गोतमारे, प्रमोद ढवळी, पांडुरंग डबले, गणेश नाखले, किशोर कडू, विलास मोहोड, राम मानमोडे, प्रसाद मानमोडे, अशोक पवार यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com