मंगळवेढा - वंचित बहुजन आघाडीचा मतदार एकत्र आला तर धक्कादायक निकाल शक्य

पंढरपूर विधानसभा मतदार संघातील सर्वसाधारण जागेवर इच्छुक असणाऱ्यांची संख्या वाढू लागली असून या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचा विस्कटलेला मतदार एकत्र आला तर धक्कादायक निकाल लागू शकतो. मात्र, वंचित आघाडीला स्थानिक सक्षम उमेदवार नसल्याने बाहेरून आयात उमेदवार आणला तरच लढा देता येऊ शकेल.
मंगळवेढा - वंचित बहुजन आघाडीचा मतदार एकत्र आला तर धक्कादायक निकाल शक्य

मंगळवेढा  : पंढरपूर विधानसभा मतदार संघातील सर्वसाधारण जागेवर इच्छुक असणाऱ्यांची संख्या वाढू लागली असून या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचा  विस्कटलेला मतदार एकत्र आला तर धक्कादायक निकाल लागू शकतो. मात्र, वंचित आघाडीला स्थानिक सक्षम उमेदवार नसल्याने बाहेरून आयात उमेदवार आणला तरच लढा देता येऊ शकेल.

लोकसभा निवडणुकीपुर्वी दलित, मुस्लिम, धनगर, या वंचित समाजाने एकत्र वंचित बहुजन आघाडी स्थापन करून पहिल्यांदाच औरंगाबाद मध्ये खाते खोलले. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक जागा पाडण्यात यश आल्याने आगामी विधानसभा निवडणुकीत ही आघाडी आता निर्णायक  वळणावर आली. असली तरी पंढरपूर विधानसभेसाठी सध्या साखर सम्राटच दावेदार असून जि. प. सदस्या शैला गोडसे या जरी साखरसम्राट नसल्या तरी त्यांच्या मागे आधार असलेले जलसंधारण मंत्री सावंत हे सुध्दा साखर सम्राटच आहेत.अशा या साखर सम्राटाच्या प्रभावाखाली असलेल्या मतदारसंघात बहुजन वंचित आघाडीचा मतदार देखील मोठ्या प्रमाणात आहेत.

पण  लोकसभा निवडणुकीमध्ये सोलापूर मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी आपले नशीब आजमावले होते. मात्र, मंगळवेढा भागातून इतक्या मोठ्या प्रमाणावर मुस्लिम दलित धनगर मतदार असून देखील त्यांना नगण्य मते मिळाली होती. आजपर्यंत मंगळवेढ्याच्या राजकीय इतिहासाकडे पाहिले असता प्रत्येक विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या भागातील मतदारांनी वेगळ्या विचारानेच मतदान केले आहे 2009 विधानसभा निवडणूक 'मोहिते-पाटील नको' या विचाराने प्रेरित झाली. 2014 ला भालके यांचा करीष्मा दिसून आला. लोकसभा निवडणुकीत देखील काँग्रेस च्या उमेदवारास मताधिक्य मिळाले. मात्र, वंचित बहुजन आघाडी चा प्रयोग तालुक्यात यशस्वी झाल्याचे दिसले नाही, याचे महत्त्वाचे कारण म्हणजे  धनगर मुस्लिम समाजात तालुकास्तरीय नेतृत्व नसणे हे आहे 

शहरात प्रविण खवतोडे, बशीर बागवान, बाबुभाई मकानदार, जि.प.सदस्या मंजुळा कोळेकर, सभापती प्रदीप खांडेकर,सचिन शिवशरण,उज्वला मस्के, तानाजी खरात, रघुनाथ पडोळकर ,नामदेव जानकर, जगन्नाथ रेवे, दादा गरंडे ,भिवा दौलतडे, सुधाकर मासाळ, शिवाजी पटाप, ज्ञानेश्वर खांडेकर, सुरेश कोळेकर, ईश्वर गडदे, धनाजी बिचुकले, बापू मेटकरी हे बहुजन समाजातील नेते असले तरी ते ढोबळे भालके परिचारक अवताडे यांच्यासोबत तर काही जण रासप मध्ये आपली राजकीय कारकीर्द घडवत आहेत त्यामुळे येणाऱ्या विधानसभेमध्ये देखील सक्षम व तुल्यबळ स्थानिक उमेदवार वंचित आघाडीकडे दिसून येत नसल्याने वंचित आघाडी बाहेरून उमेदवार आयात करते का, याकडे तालुक्यातील राजकीय जाणकारांचे लक्ष लागले आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com