आजचा वाढदिवस : सोनिया गांधी, कॉंग्रेस अध्यक्षा. - soniya gandhi congress | Politics Marathi News - Sarkarnama

आजचा वाढदिवस : सोनिया गांधी, कॉंग्रेस अध्यक्षा.

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 9 डिसेंबर 2017

माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांच्यानंतर त्या कॉंग्रेसच्या अध्यक्षा झाल्या. कॉंग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर त्यांनी कॉंग्रेसची ढासळती अवस्था नीट करून पक्षाला पुन्हा सत्तेवर आणले. 1968 मध्ये त्यांचा राजीव गांधी यांच्याशी विवाह झाला. 1991 मध्ये पतीच्या हत्येनंतर सोनियांजीना कॉंग्रेस नेत्यांनी नेतृत्व करण्यास आग्रह केला पण त्यांनी नकार दिला होता आणि राजकारणापासून दूर राहिल्या होत्या. कॉंग्रेस कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर 1997 पासून राजकारणात सक्रिय झाल्या. त्यांच्या नेतृत्वाखाली 2004 व 2009 मध्ये लोकसभा निवडणुकीत विजय मिळवून त्यांच्या नेतृत्वाखाली देशात कॉंग्रेसचे सरकार स्थापन झाले.

माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांच्यानंतर त्या कॉंग्रेसच्या अध्यक्षा झाल्या. कॉंग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर त्यांनी कॉंग्रेसची ढासळती अवस्था नीट करून पक्षाला पुन्हा सत्तेवर आणले. 1968 मध्ये त्यांचा राजीव गांधी यांच्याशी विवाह झाला. 1991 मध्ये पतीच्या हत्येनंतर सोनियांजीना कॉंग्रेस नेत्यांनी नेतृत्व करण्यास आग्रह केला पण त्यांनी नकार दिला होता आणि राजकारणापासून दूर राहिल्या होत्या. कॉंग्रेस कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर 1997 पासून राजकारणात सक्रिय झाल्या. त्यांच्या नेतृत्वाखाली 2004 व 2009 मध्ये लोकसभा निवडणुकीत विजय मिळवून त्यांच्या नेतृत्वाखाली देशात कॉंग्रेसचे सरकार स्थापन झाले. युपीए सरकारच्या दुसऱ्या टर्मच्या अखेरच्या पर्वात त्यांनी राजकारणातील सक्रिय सहभाग कमी करायला सुरुवात केली. त्यांना विदेशी व इतर अनेक मुद्यांवर विरोध झाला; पण त्यांनी समर्थपणे या विरोधाचा मुकाबला केला. जगातील सर्वात शक्तिशाली स्त्रियांमध्ये त्यांची नोंद होते. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख