भारतात धर्मांधतेला जागा नाही : सोनिया गांधी 

भारतात कट्टरतावाद आणि धर्मांधतेला जागा नाही, असे ठाम प्रतिपादन कॉंग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी गुरुवारी (ता. 15) केले. स्वातंत्र्याचे खऱ्या अर्थाने रक्षण करण्यासाठी देशबांधवांनी सर्व प्रकारचा अन्याय, असहिष्णुता आणि भेदभावाच्या विरोधात उभे राहावे, असे आवाहनही त्यांनी केले.
भारतात धर्मांधतेला जागा नाही : सोनिया गांधी 

नवी दिल्ली  : भारतात कट्टरतावाद आणि धर्मांधतेला जागा नाही, असे ठाम प्रतिपादन कॉंग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी गुरुवारी (ता. 15) केले. स्वातंत्र्याचे खऱ्या अर्थाने रक्षण करण्यासाठी देशबांधवांनी सर्व प्रकारचा अन्याय, असहिष्णुता आणि भेदभावाच्या विरोधात उभे राहावे, असे आवाहनही त्यांनी केले. 

कॉंग्रेसच्या मुख्यालयात झालेल्या स्वातंत्र्य दिन समारंभात तिरंगा फडकावल्यानंतर सोनिया गांधी बोलत होत्या. राजकीय, सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रांत करुणा, सहअस्तित्व आणि सर्वसमावेशक विकास या मूलतत्त्वांना नवसंजीवनी देण्याचे आवाहन त्यांनी देशवासीयांना केले. भारताने सर्व क्षेत्रांत मोठी प्रगती केली आहे. सत्य, अहिंसा, करुणा आणि ठाम देशप्रेम हे घटक या प्रगतीचा आधार आहेत, असे त्या म्हणाल्या. राहुल गांधी यांनीही ट्‌विटरवरून देशवासीयांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. 

स्वातंत्र्याचा 72 वा वर्धापन दिन साजरा करणाऱ्या लोकशाहीवादी आणि चैतन्यशील भारतात धर्मांधता, अंधश्रद्धा, संकुचितपणा, कट्टरतावाद, वंशभेद, असहिष्णुता आणि अन्यायाला जागा नाही, असे त्यांनी ठासून सांगितले. परंतु, लाखो देशबांधवांना आजही दररोज भेदभावाला सामोरे जावे लागत आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. अन्याय, असहिष्णुता आणि भेदभावाच्या विरोधात सर्वांनी ठामपणे उभे राहावे; स्वातंत्र्याचे खऱ्या अर्थाने रक्षण करावे, असे आवाहन त्यांनी केले. 

बलिदानाचे सदैव स्मरण
देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य देशभक्तांच्या त्यागाचे फळ आहे. म्हणूनच स्वातंत्र्य, बंधुत्व, शांतता आणि समता यांचे रक्षण व संवर्धन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, असे सोनिया गांधी म्हणाल्या. भारताची एकात्मता टिकवण्यासाठी सैन्य दलातील जवानांच्या बलिदानाचे आपण सदोदित स्मरण ठेवले पाहिजे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. देशाच्या उभारणीत शेतकरी, कामगार, कारागीर, शास्त्रज्ञ, व्यापारी, उद्योजक, शिक्षक, लेखक, कलाकार, विचारवंत आदी सर्व घटकांचे योगदान असल्याचा त्यांनी गौरवपूर्वक उल्लेख केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com