`सोनिया गांधींमुळेच आम्ही शक्तिशाली'

कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचा आज 73 वा वाढदिवस. त्यानिमित्त सोनिया गांधीं यांचे कॉंग्रेससह विविध पक्षातील नेत्यांनी अभिष्टचिंतन केले आहे.
`सोनिया गांधींमुळेच आम्ही शक्तिशाली'

पुणे - कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचा आज 73 वा वाढदिवस. त्यानिमित्त सोनिया गांधीं यांचे कॉंग्रेससह विविध पक्षातील नेत्यांनी अभिष्टचिंतन केले आहे. 

सोनिया गांधी यांच्यामुळेच आम्ही शक्तिशाली आहोत, अशी भावना मुंबई कॉंग्रेसने व्यक्त केली आहे. त्यासाठी एक व्हिडिओही ट्विट केला आहे. व्हिडिओच्या माध्यमातून सोनिया गांधी यांचे अभिष्टचिंतन करताना त्यांच्या कारकिर्दीचा छोटेखानी आढावा घेतला आहे. कॉंग्रेसच्या नेतृत्वाची 19 वर्षे धुरा सांभाळणाऱ्या नेत्या, 19 वर्षांपासून कॉंग्रेसच्या सेवेत असणाऱ्या नेत्या, सर्वाधिक वर्षे कॉंग्रेसच्या सर्वोच्च नेतेपदावर असणाऱ्या नेत्या, यूपीएच्या अध्यक्षा असणाऱ्या सोनिया गांधींच्या वाटचालीचा हा आढावा आहे. 

राजीव गांधी-सोनिया गांधीच्या विवाहाच्या छायाचित्रांनी या आढाव्याची सुरवात होते. सोनिया गांधींचा कॉंग्रेसमधील प्रवास प्रेमाने झाल्याचे त्यात म्हटले आहे. त्यानंतर सोनियांच्या त्यागाची संघर्षमय कहानी सुरू होते. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची 1984 मध्ये आणि राजीव गांधी यांची 1991 मध्ये हत्या झाली. देशाने दोन पंतप्रधान गमावले. परंतु सोनियांनी इंदिरा गांधींच्या जाण्याने गुरुला गमावले, तर राजीव गांधींच्या जाण्याने पतीला गमावले.

सोनियांना फिनिक्स पक्षाची उपमा देत, फिनिक्स पक्षी ज्या प्रमाणे राखेतून पुन्हा भरारी घेतो, त्याचप्रमाणे सोनिया गांधींनी कॉंग्रेसला उभारी दिल्याचे म्हटले आहे. कॉंग्रेस संपली असे प्रत्येकालाच वाटत असताना सोनिया गांधींनी प्रतिकूल परिस्थितीत 2004 मध्ये कॉंग्रेसला सत्तास्थानी आणले. सोनिया गांधींच्या नेतृत्वात दोन टर्म यूपीएचे सरकार केंद्रात राहिल्याचेही त्यात म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com