`पुढील सहा महिन्यांत राज्यात मोठे काहीतरी घडणार`

...
Meghana bordikar
Meghana bordikar

शिक्रापूर : शिवसेनेसह कुणाबद्दलही आपली राजकीय मते व्यक्त करु नका, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला सूचित केलेले आहे. त्यामुळे पुढील सहा महिन्यांत राज्यात मोठे काहीतरी घडणार आहे, असा दावा भाजपच्या जिंतूर-सेलूच्या आमदार मेघना बोर्डीकर-साकोरे यांनी केला.

आपल्या सासरी केंदूर (ता.शिरूर, जि.पुणे) येथील ग्रामस्थांशी चर्चा करताना आगामी राज्याच्या राजकारणाबद्दल कुतुहल निर्माण केले. केंदूर येथील राष्ट्रवादीचे युवा कार्यकर्ते भरत साकोरे व भाजपाचे तालुका उपाध्यक्ष बाळासाहेब साकोरे यांच्या पुढाकाराने केंदूर ग्रामस्थांचे वतीने जिंतूर-सेलूच्या (जि.परभणी) आमदार मेघना दीपक साकोरे यांचा जाहीर सत्कार ग्रामदैवत केंद्राई मातेच्या मंदिरात पार पडला.

सभापती विश्वास कोहकडे, सुभाष उमाप, भगवानराव शेळके, सविता प-हाड, अ‍ॅड.दत्तात्रय थिटे, रामशेठ थिटे, विजय थिटे यांच्या प्रमुख उपस्थितीत सरपंच वंदना ताठे यांनी सौ.साकोरे यांना शाल, श्रीफल, पुष्पगुच्छ व सन्मानपत्र देवून गावचे वतीने सन्मानित केले. यावेळी बोलताना त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. 
त्यापुढे म्हणाल्या की मुलगी दहावीला असताना जावूबाई डॉ. सुचित्रा साकोरे, मंत्रालयात उपसचित असलेले दिर राहूल साकोरे, सासु-सासरे आणि सर्व कुटुंबांनी कुटुंब म्हणून निभावलेली जबाबदारी मी आयुष्यभर विसरणार नाही आणि त्यांच्याच बळावर विधानसभेत पोहचले. त्यामुळे केंदूरची सुन असल्याने गावच्या पाण्यासह इतर सर्व प्रश्नांच्या बाबतीत मी प्राधान्याने विधानसभेत मांडून प्रश्नमुक्त केंदूर करण्याचा प्रयत्न करेन.

 यावेळी पत्रकारांशी बोलताना बोर्डीकर यांनी सांगितले की, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आम्हा सर्व १०५ आमदारांच्या चांगल्या संवादात आहेत. भाजपच्या एकाही आमदाराबद्दल संशय निर्माण होण्याची शक्यता नाही. हा केवळ विरोधकांचा बोभाटा आहे. आम्हाला फडणवीस आणि पक्षाचे वरिष्ठ जशा सुचना देतील तशी भूमिका आम्ही निभावणार असून पुढील सहा महिन्याच्या काळात नेमके काय होणार याची आम्हाला काहीच कल्पना नाही. मात्र काही तरी मोठे घडणार हे नक्की!
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com