मोदी आणि आमच्यात कुणीतरी फूट पाडते आहे : संजय राऊतांचा अमित शहांवर निशाणा?

भाजपने जी वचने दिली होती त्याला ते जागले नाहीत. बंद दाराआड झालेल्या चर्चेवर अंमलबजावणी झाली नसल्याने आता बोलण्याची वेळ आली आहे, असे शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. लिलावती रुग्णालयातून अँजिओप्लास्टी होऊन परत आल्याच्या दुसऱ्याच दिवशी राऊत पत्रकारांना सामोरे गेले. मात्र, आघाडीसमोबत सुरु असलेल्या चर्चेबाबत त्यांनी मौन बाळगले.
Amit Shah - Sanjay Raut
Amit Shah - Sanjay Raut

मुंबई : भाजपने जी वचने दिली होती त्याला ते जागले नाहीत. बंद दाराआड झालेल्या चर्चेवर अंमलबजावणी झाली नसल्याने आता बोलण्याची वेळ आली आहे, असे शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. लिलावती रुग्णालयातून अँजिओप्लास्टी होऊन परत आल्याच्या दुसऱ्याच दिवशी राऊत पत्रकारांना सामोरे गेले. मात्र, आघाडीसमोबत सुरु असलेल्या चर्चेबाबत त्यांनी मौन बाळगले.

राऊत म्हणाले, "मोदीं आणि आपल्यामध्ये कोणीतरी अंतर आणण्याचा प्रयत्न करते आहे. सर्व सभांमध्ये उद्धव ठाकरे यांनी सांगितलं होतं की सेनेचा मुख्यमंत्री होणार. पण लोकसभा निवडणूक होईपर्यन्त भाजप काही बोलला नाही. फक्त विधानसभाच्या वेळी हे समोर आले. ही नैतिकता नाही. उद्धव ठाकरे आणि अमित शहा यांच्यात बंद दरवाजा आड काय काय चर्चा झाली हे मोदींना सांगितले गेले नाही.''

ते पुढे म्हणाले, "मोदी आम्हाला प्रिय आहेत आणि पुढेही राहतील, बंद खोलीत जे ठरलं ते महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी होते. या सर्व गोष्टी मोदीं पर्यन्त गेल्या असत्या तर आज ही वेळ आली नसती.आमच्या साठी ही खोली मंदिर आहे. जर आता ते असे बोलत असतील तर या खोलीचा आणि महाराष्ट्रचा अपमान आहे. ज्या खोलीत चर्चा झाली ती खोली स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची खोली होती.राजकारण आमच्या साठी धंदा नाही  आम्ही व्यापारी नाही,'' येत्या 17 तारखला स्वर्गीय बाळासाहेबांचा स्मृतिदिन आहे म्हणून सगळ्या आमदारांना मुंबईत बोलावले असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com