शिवसेनेतील काही नेते म्हणताहेत ,एकदा मोदींना भेटलायला काय हरकत ? 

..
shivsena-BJP
shivsena-BJP

मुंबई :  हिंदुत्ववादी मतपेटी हेच आपले बलस्थान असल्याचे लक्षात आणून देत महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत आपण भारतीय जनता पक्षासमवेत जी युती केली ती कायम ठेवणे गरजेचे असल्याचे मत शिवसेनेतील काही  नेत्यांनी मांडले आहे. सेनेला मुख्यमंत्रीपद देण्याचा आग्रह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेवून त्यांच्या लक्षात आणून दयावा अशी या ज्येष्ठांची इच्छा आहे असे समजते.

 आपल्या मागण्या पुन्हा एकदा त्याच मंचावर मांडाव्यात अशी विनंती पक्षप्रमुख उदधव ठाकरे यांना करण्यात येणार आहे. आज या संदर्भात त्यांच्या निकटवर्तीयांकडे प्रास्तविक करण्यात आले आहे असे विश्‍वसनीयरित्या समजते. 

कॉंग्रेसचे नेते आपल्याला कोणतेही आश्‍वासन देत नसून सतत राष्ट्रवादी कॉंग्रेसशी चर्चा करू एवढेच सांगत आहेत. ही आघाडी प्रत्यक्षात आली तरी ती आपल्या मतदारांना पटणारी नाही. सेनेला दिलेला शब्द पाळा अशी विनंती करण्यासाठी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्यात गैर ते काय असाही या नेत्यांचा पवित्रा आहे. 

सेनेत अत्यंत वरिष्ठ पातळीवर वावरणाऱ्या या नेत्यांनी विधीमंडळ पक्षाचेनेते एकनाथ शिंदे, ज्येष्ठ नेते सुभाष देसाई आणि सेनेचे कार्यप्रमुख उदधव ठाकरे यांचे स्वीय सचिव मिलिंद नार्वेकर यांच्याशी संपर्क साधला आहे. गेले काही दिवस दबक्‍या आवाजात सुरू असलेली ही चर्चा आता उदधवजींपर्यत पोहोचवावी, एनडीएतून आपल्याला काढून टाकले असले तरी या विषयावर एकदा थेट मोदींशी चर्चा करावी असा या मंडळींचा प्रस्ताव असल्याचे समजते.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com