प्रतिकार करताना इम्तियाज यांना कुणी तरी मारले: कदिर मौलाना

maulana_vs_Imtiaz
maulana_vs_Imtiaz

औरंगाबाद - मतदान केंद्रावर राडा केल्याप्रकरणी खासदार इम्तियाज जलील यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करावी, अन्यथा रस्त्यावर उतरू, असा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस महाआघाडीचे उमेदवार कदिर मौलाना यांनी येथे दिला. 

तसेच नगरसेवक होण्याची लायकी नसलेल्या व्यक्‍तीला जनतेनी खासदार करून संसदेत पाठवले. अशा व्यक्‍तींनी शहर शांत ठेवण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी त्यांनीच राडे सुरु केली, याबद्दल त्यांनी खंत व्यक्‍त केली.

औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघात मतदानाच्या दिवशी सायंकाळी सव्वापाच वाजेच्या सुमारास राष्ट्रवादी कॉंग्रेस व एमआयएमच्या पदाधिकाऱ्यांमध्ये राडा झाला. 

याबाबत माध्यमांना अधिक माहिती देण्यासाठी बुधवारी (ता.23) आयोजित पत्रकार परिषदेत कदिर मौलाना म्हणाले, कटकटगेट परिसरात सुरवातीला एमआयएमचे उमेदवार नासेर सिद्धीकी आणि महाआघाडीचे कार्यकर्ते किरकोळ वाद झाले होते. तेंव्हा आम्ही पुढाकार घेत शांत भंग होऊ नये, म्हणून त्यांची समजूनही काढली. मात्र, त्यांनी ही बाब खासदार जलील यांना सांगीतली असावी, त्यानंतर कट रचल्याप्रमाणे त्यांनी आमच्यावर हल्ला केला. 

प्रतिविरोध करताना खासदार इम्तियाज यांना कुणीतरी मारले. त्यांना मारल्याचे आम्हालाही वाईट वाटले. मात्र, शांततेसाठी पुढाकार घेण्याऐवजी जर असे राडे करणार असतील, लोक गप्प बसणार नाहीत त्यांना मारणारच, असेही कदिर मौलाना यांनी स्पष्ट केले.

यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश प्रवक्‍ता सुरजितसिंग खुंगर, जिल्हाध्यक्ष विजय साळवे, व्दारकाभाऊ पाथ्रीकर, अफसरखान उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com