Solapur ZP news | Sarkarnama

सोलापूर जि.प. मध्ये अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांत वरून दोस्ती आतून कुस्ती

संतोष पवार
शुक्रवार, 29 सप्टेंबर 2017

जिल्हा परिषदेचे सिईओ पदाधिकाऱ्यांना विचारात घेत नसल्यामुळे अनेकवेळा वाद झाले. अटीतटीचे प्रसंगही निर्माण झाले मात्र सर मिसळीची सत्ता असल्यामुळे अधिकारी हे पदाधिकाऱ्यांच्या वरचढ झाल्याचे चित्र निर्माण झाले होते. अर्थ समितीच्या बैठकीसाठी खातेप्रमुख कोणीही उपस्थित राहत नाही. अर्थ समिती ही खर्चाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची समिती आहे. या समितीच्या बैठकांसाठी खातेप्रमुख उपस्थित राहत नसून लिपीकांना बैठकीला पाठवून देत आहेत. या सर्व प्रकारामुळे अर्थ समितीमधील सदस्य प्रचंड संतापले आहेत.

सोलापूर : तीन स्थानिक आघाड्या, शेकाप, भाजपा, काँग्रेस आणि अपक्षांच्या जीवावर चालत असलेल्या सोलापूर जिल्हा परिषदेत अधिकारी आणि पदाधिकारी यांच्यात कायमच खटके उडण्याचे प्रकार सुरू आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारूड हे पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता कामकाज करीत असल्यामुळे जिल्हा परिषदेतील इतर अधिकारी देखील पदाधिकाऱ्यांना कोणत्याही प्रकारची किंमत न देता काम करत असल्यामुळे पदाधिकाऱ्यामध्ये नाराजीचा सुरू पसरला आहे.

जिल्हा परिषदेचे सिईओ पदाधिकाऱ्यांना विचारात घेत नसल्यामुळे अनेकवेळा वाद झाले. अटीतटीचे प्रसंगही निर्माण झाले मात्र सर मिसळीची सत्ता असल्यामुळे अधिकारी हे पदाधिकाऱ्यांच्या वरचढ झाल्याचे चित्र निर्माण झाले होते. अर्थ समितीच्या बैठकीसाठी खातेप्रमुख कोणीही उपस्थित राहत नाही. अर्थ समिती ही खर्चाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची समिती आहे. या समितीच्या बैठकांसाठी खातेप्रमुख उपस्थित राहत नसून लिपीकांना बैठकीला पाठवून देत आहेत. या सर्व प्रकारामुळे अर्थ समितीमधील सदस्य प्रचंड संतापले आहेत. त्यामुळे येणाऱ्या अर्थ समितीमध्ये जर खाते प्रमुख उपस्थित राहिले नाही तर त्या खात्याच्या खर्चाला मान्यता द्यायची नाही अशी भूमिका अर्थ समितीने घेतली असल्याची माहिती अर्थ समितीचे सदस्य भारत शिंदे यांनी दिली आहे. पदाधिकाऱ्यांनी सांगून देखील अधिकारी बैठकांना उपस्थित राहत नाहीत त्यामुळेच अर्थ समितीला हा निर्णय घ्यावा लागलेला असल्याचे भारत शिंदे यांनी सांगितले.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारूड हे पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता निर्णय घेत आहेत. दहा दिवसापूर्वी भारूड यांनी जिल्ह्यातील मोठ्या ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि उपसरपंच यांची जिल्हा मुख्यालयात बैठक घेतली. या बैठकीला स्थानिक जिल्हा परिषद सदस्यांना बोलाविण्यात आले नव्हते. जिल्हा परिषद सदस्यांना बोलाविले नसल्यामुळे त्या परिसरातील सरपंच आणि उपसरपंच यांची थेट मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासोबत झालेली बैठक ही सदस्यांना खटकली आहे. भाजपची सोबत घेऊन जिल्हा परिषदेची सत्ता मिळालेली असल्यामुळे जिल्हा परिषदेमध्ये भाजपाचा सभागृह नेता आहे. भाजपचे असलेले सभागृह नेते आनंद तानवडे यांनी देखील मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कार्यशैलीबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.

जिल्हा परिषदेचे प्रशासन प्रमुख असलेले मुख्य कार्यकारी अधिकारी हेच पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता काम करत असल्यामुळे त्यांच्या नंतरचे खातेप्रमुख आणि जिल्हा परिषदेतील अधिकारी आणि कर्मचारी वर्ग हा जिल्हा परिषदेच्या सदस्यांना विचारच नाहीत असा आरोप जि.प. सदस्याकडून केला जातोय. सत्ताधारी असलेल्या भाजपाच्या सदस्यांनी देखील सीईओ भारूड यांच्या कामकाजाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. अधिकाऱ्यांनी काम करतांना पदाधिकाऱ्यांच्या अधिकारावर गदा येऊ न देता कामकाज करणे गरजेचे आहे मात्र तसे होतांना दिसत नसल्याच्या प्रतिक्रिया जि.प. सदस्यातून येत आहेत.

जिल्हा परिषदेत भाजप पुरस्कृत अपक्ष असलेल्या संजय शिंदे यांना जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद दिल्यामुळे भाजपाला त्यांची सत्ता आहे असे वाटते. तर राष्ट्रवादीचे बहूमत असतांना देखील राष्ट्रवादीने अध्यक्षपद बिनविरोध सोडले त्यामुळे त्यांना त्यांची सत्ता आहे असे वाटते. शेकाप, कॉंग्रेस स्थानिक आघाड्या यांनी संजय शिंदे यांना मदत केल्यामुळे त्यांनाही सत्ता त्यांचीच आहे असे वाटते. सर्वांनाच सर्वांची सत्ता आहे असे वाटत असले तरी प्रत्यक्षात जि.प. सदस्यांची कोणतीच कामे होत नाहीत अशी ओरड आता सुरू झाली आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख