सोलापूर जिल्हा परिषदेतील महाविकास आघाडीचे सदस्य साईबाबांच्या दर्शनासाठी रवाना

सोलापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षांची मंगळवारी (ता.31) निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी राज्यात नव्याने सत्तेत आलेल्या राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षांच्या महाविकास आघाडीने सोलापूर जिल्हा परिषदेवर वर्चस्व मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत.
Solapur Zilla Parishad Mahavikas Aghadi Members Went to Shiridi for Saibaba Darshan
Solapur Zilla Parishad Mahavikas Aghadi Members Went to Shiridi for Saibaba Darshan

पंढरपूर : सोलापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडणूक मोर्चे बांधणीसाठी आज महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये पंढरपुरात  दिवसभर  खलबते झाली. सायंकाळी आमदार भारत भालकेंच्या निवासस्थानी सर्व प्रमुख नेते आणि जिल्हा परिषद सदस्यांची बैठक झाली. बैठकीनंतर महाविकास आघाडी सोबत असलेले जवळपास 37 सदस्य साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीच्या सहलीवर गेले. मंगळवारी (ता. 31) होणाऱ्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत राजकीय चत्मकार घडतो की पुन्हा समविचारी आघाडीच आपले वर्चस्व कायम ठेवते याकडेच लक्ष लागले आहे.

सोलापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षांची  मंगळवारी (ता.31)  निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी राज्यात नव्याने सत्तेत आलेल्या राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षांच्या महाविकास आघाडीने सोलापूर जिल्हा परिषदेवर वर्चस्व मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत. गेल्यावेळी समविचारी आघाडी सोबत असलेले अनेक नेते यावेळी महाविकास आघाडीसोबत असल्याचे दिसते.

आज दुपारी येथील शासकीय विश्राम गृह येथे सर्व जिल्हा परिषद सदस्य आणि नेत्यांमध्ये गुप्तगू झाले. त्यानंतर आमदार भारत भालके यांच्या निवासस्थानी सर्व सदस्य आणि प्रमुख नेते मंडळींची बैठक झाली. बैठकीमध्ये सर्व सदस्यांना पक्ष पातळीवर झालेल्या निर्णयाची माहिती देण्यात आली. ऐनवेळी राजकीय दगाफटका बसू नये म्हणून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सर्व सदस्यांना सहलीवर पाठवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सायंकाळी  सर्व 37 सदस्य एका खासगी बसने शिर्डीच्या साईबाबांच्या दर्शनासाठी गेल्याचे सांगण्यात आले.

समविचारी आघाडीचेही 22 सदस्य सहलीवर 

जिल्हा परिषदेवर आपले वर्चस्व कायम ठेवण्यासाठी समविचार आघाडीच्या नेत्यांनीही कंबर कसली आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीसाठी महाविकास आघाडी सोबत असलेल्या पक्षाच्या नेत्यांनी हजेली लावली होती. त्यामुळे या निवडणुकीडे लक्ष लागले आहे. समविचारा आघाडीनेही 22 सदस्यांना सहलीवर पाठवले आहे. मंगळवारी होणाऱ्या निवडणुकीत काय निकाल येतो, याकडेच जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com