'गुलाल आमचाच'....सांगोल्यात निकालाबाबत लागल्या पैजा

विधानसभेसाठी मतदान झाले, आता निकालाची प्रतीक्षा सर्वांनाच लागली आहे. निकालाबाबत सांगोला शहराबरोबरच ग्रामीण भागातही सर्वच ठिकाणी निकालाबाबत पैजा लावल्या जात आहेत. ग्रामीण भागातील गाव कट्ट्यांवर, हॉटेल्स, टपऱ्यांवर एवढेच नाही तर पाहुण्या रावळांमध्येही आप-आपल्या तालुक्यातील निकालाची चर्चा होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. दोन्ही बाजूचे कार्यकर्ते 'गुलाल आमचाच' असे ठामपणे सांगत आहेत.
Sangola - Shahajibapu Patil - Dr. Aniket Deshmukh
Sangola - Shahajibapu Patil - Dr. Aniket Deshmukh

सांगोला : विधानसभेसाठी मतदान झाले, आता निकालाची प्रतीक्षा सर्वांनाच लागली आहे. निकालाबाबत सांगोला शहराबरोबरच ग्रामीण भागातही सर्वच ठिकाणी निकालाबाबत पैजा लावल्या जात आहेत. ग्रामीण भागातील गाव कट्ट्यांवर, हॉटेल्स, टपऱ्यांवर एवढेच नाही तर पाहुण्या रावळांमध्येही आप-आपल्या तालुक्यातील निकालाची चर्चा होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. दोन्ही बाजूचे कार्यकर्ते 'गुलाल आमचाच' असे ठामपणे सांगत आहेत.

मतदान झाले आता सर्वांनाच प्रतीक्षा लागली आहे ती २४ तारखेच्या निकालाची. तालुक्यात सर्वत्र निकालाबाबत वेगवेगळ्या चर्चा ऐकू येऊ लागले आहेत. सोशल मीडियावर तर आपलेच उमेदवार कसे निवडून येणार, याबाबत जिल्हा परिषद गटानुसार किती मते मिळणार, कोणामुळे कोण लीड घेणार, आतुन कोणी आपल्याला मदत केली व त्यामुळे उमेदवार कसा जिंकणार हेही सध्या प्रसिद्ध केले जात आहे. 

तालुक्यात यावेळी आमदार गणपतराव देशमुख निवडणुकीला उभे राहणार नाही असे जाहीर केल्यापासून सगळीकडेच या विधानसभेची वेगळीच चर्चा होती. शेकापचे उमेदवार डॉ. अनिकेत देशमुख व महायुतीचे उमेदवार शहाजीबापू पाटील यांच्यामध्ये कडवी लढत झाली आहे. अपक्ष उमेदवार राजश्री नागणे यांनीही भाजपमधून बंडखोरी करत 'एकला चलो रे'चा नारा दिला. त्या कोणाच्या व किती मते घेणार याकडेही सगळ्यांचे लक्ष लागले आहे. 

विधानसभेच्या रिंगणात एकुण वीस उमेदवार आपले नशीब आजमावून पाहत आहेत. तालुक्यात सध्या शहराबरोबरच ग्रामीण भागातही निकालाबाबत वेगवेगळ्या स्वरूपाच्या पैजा लावल्या जात आहेत. एवढेच नव्हे तर घरी आलेले पै-पाहुणे ही ही तालुक्यातील सध्याच्या राजकीय स्थितीवर व निकालाबाबत स्थिती जाणून घेत आहेत. तसेच आपल्या तालुक्यातही कोण कसे जिंकणार याबाबत विस्ताराने सांगत आहेत. निकालाच्या अगोदर सध्या महायुती व शेकाप 

शहाजीबापू पाटील यांना १९९५ चा अपवाद वगळता सतत आमदार देशमुख यांच्याकडून हार पत्करावी लागत होती. परंतू यावेळी बापुंचे कार्यकर्ते गुलाल नक्की आम्हीच लावणार असे सांगत आहेत. तर शेकापकडुन नेहमीप्रमाणे कार्यकर्ते तुम्ही कितीही निकाला अगोदर बोला निकालाचा गुलाल आमचाच असतो, असे ठामपणे सांगत आहेत. त्यामुळे गुलालाची चर्चा तालुकाभर रंगत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com