solapur vidyapeeth | Sarkarnama

अहिल्याबाई विद्यापीठाच्या मुद्यावर भाजप सरकार तोंडघशी! 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 9 ऑगस्ट 2017

धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण लागू करण्याचे आश्‍वसन पाळता येणे शक्‍य नसल्याने दोन वर्षापुर्वी भाजप सरकारने सोलापूर विद्यापीठाल अहिल्याबाई होळकर यांचे नाव देण्याची घोषणा केली होती. मात्र या मुद्यावर पुर्णपणे तोंडघशी पडण्याची वेळ भाजपवर आली आहे. 

पुणे: धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण लागू करण्याचे आश्‍वसन पाळता येणे शक्‍य नसल्याने दोन वर्षापुर्वी भाजप सरकारने सोलापूर विद्यापीठाल अहिल्याबाई होळकर यांचे नाव देण्याची घोषणा केली होती. मात्र या मुद्यावर पुर्णपणे तोंडघशी पडण्याची वेळ भाजपवर आली आहे. 

सोलापूर विद्यापीठाला अहिल्याबाईंचे नाव देण्याची मागणी अनेक वर्षापासूनची आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर नागपुरात झालेल्या मेळाव्यात त्यांनी नाव देण्यासंबंधी आश्‍वासन दिले होते. त्यानंतर 2016 साली अहिल्याबाई जयंती कार्यक्रमाच्यापुर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी धनगर समाजाच्या मागण्यासंदर्भात बैठक घेतली होती. या बैठकीसाठी तत्कालिन गृहराज्यमंत्री राम शिंदे यांचा पुढाकार होता. फडणवीस यांनी नावासंदर्भाने प्रस्ताव देण्याचे निर्देश दिले होते. मंत्री शिंदे यांनी तत्वत: मान्यता दिल्याचे सांगितले होते. 
ं 
आश्‍वासन दिल्याप्रमाणे सरकार नामविस्तार करेल, अशी धनगर समाजबांधवांची अपेक्षा होती. मुख्यत: धनगर आरक्षणावर सरकार काय भूमिका घेतेय, यावर समाजाचे लक्ष आहे. त्यासंदर्भात सुरु असलेले सर्व्हेक्षण नकारात्मक निष्कर्षाप्रत आल्याची चर्चा आहे. त्यासंदर्भाने महत्त्वाचे कागदपत्र व्हायरल झाले होते. त्यातच आता सोलापूर विद्यापीठप्रश्‍नी सरकारला नामुष्की आल्याची बाब समोर आली आहे. 

राष्ट्रवादीचे आमदार जयंत जाधव यांनी यासंदर्भाने तारांकित प्रश्‍न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना उच्च शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विद्यापीठ प्रशासनाचा नामविस्ताराला विरोध असल्याचे सांगितले. अहिल्यबाईंचे नाव दिल्यास जातीय तेढ वाढेल, असे प्रशासनाने कळविल्याचे तावडे यांनी म्हटले आहे. त्यामुळे या नावाला खरा विरोध कोणाचा आहे, यावर धनगर समाजात चर्चा सुरु झाली आहे. धनगर समाजातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख