'वंचित' सोडणार कॉंग्रेसचा हात 

लोकसभा निवडणुकीत 40 लाखांहून अधिक मते घेतल्यानंतर विधानसभा निवडणुकीतही चांगली मते मिळतील आणि 50 हून अधिक आमदार विजयी होतील, असा विश्‍वास 'वंचित'ला वाटू लागला आहे. तत्पूर्वी, अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी प्रस्थापितांना 'वंचित'चे अस्तित्व दाखविण्यासाठी स्वबळाची भूमिका घेतली. मात्र, माजी आमदार लक्ष्मण माने यांच्यासह 'एमआयएम'ला तो निर्णय न पटल्याने त्यांनी वंचित आघाडीपासून फारकत घेतली आहे.
Prakash Ambedkar
Prakash Ambedkar

सोलापूर : विधानसभा निवडणुकीत 144 जागा आणि मुख्यमंत्रिपद द्यावे, असा प्रस्ताव वंचित बहुजन आघाडीने कॉंग्रेसला दिला आहे. निर्णयासाठी 'वंचित'ने ऑगस्टपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. मात्र, कॉंग्रेसला हा समझोता अमान्य असल्याने वंचित बहुजन आघाडी स्वबळावरच लढेल, असे 'वंचित'च्या सूत्रांनी सांगितले. तर 'एमआयएम'ला सोबत घेण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत. परंतु, अद्याप सकारात्मक चर्चा झाली नसल्याचेही सांगण्यात आले. त्यामुळे एमआयएम किती जागा लढविणार अन्‌ त्याचा फटका कोणाला बसणार, याचा अंदाज बांधला जात आहे.

लोकसभा निवडणुकीत 40 लाखांहून अधिक मते घेतल्यानंतर विधानसभा निवडणुकीतही चांगली मते मिळतील आणि 50 हून अधिक आमदार विजयी होतील, असा विश्‍वास 'वंचित'ला वाटू लागला आहे. तत्पूर्वी, अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी प्रस्थापितांना 'वंचित'चे अस्तित्व दाखविण्यासाठी स्वबळाची भूमिका घेतली. मात्र, माजी आमदार लक्ष्मण माने यांच्यासह 'एमआयएम'ला तो निर्णय न पटल्याने त्यांनी वंचित आघाडीपासून फारकत घेतली आहे. तर 'एमआयएम'ला आता अस्तित्वाची जाणीव झाल्याने त्यांनीही आपला हिस्सा मागण्यास सुरवात केली आहे. 

मात्र, समाजातील वंचित घटकांमधील युवकांना उमेदवारीची संधी मिळावी अशी भूमिका अॅड. आंबेडकरांनी कायम ठेवली आहे. त्यामुळे एमआयएम आता स्वबळावर लढणार की, वंचितसमवेतच राहणार का कॉंग्रेससोबत जाणार, याची उत्सुकता लागली आहे.

'भारिप'च्या कार्यकारिणीच्याही निवडी 
भारिप बहुजन महासंघाची राज्यातील कार्यकारिणी बरखास्त केल्यानंतर आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पदाधिकाऱ्यांच्या नव्याने निवडी केल्या जात आहेत. सोलापुरात मंगळवारी, त्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या पार्लमेंटरी बोर्डाच्या सदस्यांनी मुलाखती घेतल्या. मतदारसंघावर प्रभुत्व असलेल्या वंचित नवयुवकांना प्राधान्य देण्यात येत आहे. जेणेकरून त्याचा विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला फायदा होईल.

ईव्हीएमची जनजागृती कशासाठी
स्थानिक स्वराज्य संस्थांसह लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी काही वर्षांपासून ईव्हीएमचा वापर केला जात आहे. प्रत्येक मतदारांनी आपला मतदानाचा हक्‍क बजावावा म्हणून आतापर्यंत जनजागृती केली जात होती. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाखवलेले 'अच्छे दिन' व विकासाचे स्वप्न मागील पाच वर्षांत पूर्ण न झाल्याने मतदारांमध्ये नाराजी असतानाही लोकसभा निवडणुकीत भाजपला बहुमत मिळाले. त्यामुळे ईव्हीएमविरोधात सर्वपक्षीय नेत्यांनी आवाज उठवूनही निवडणूक आयोग ईव्हीएमचा हट्ट सोडायला तयार नाही. मतदारांमध्येही ईव्हीएम नको असा सूर निघत असतानाच आता ईव्हीएम जनजागृतीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. बॅलेट पेपरवर निवडणूक घेऊन भाजपने राज्यात सत्ता मिळवून दाखवावी, असे आव्हान वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्‍ते आनंद चंदनशिवे यांनी सत्ताधाऱ्यांना दिले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com