सोलापुरातील एमआयएमचे स्थानबद्ध नगरसेवक तौफिक शेख यांचे पद धोक्यात?

सोलापुरातील एमआयएमचे स्थानबद्ध नगरसेवक तौफिक शेख यांचे पद धोक्यात?

सोलापूर : एमआयएमचे स्थानबद्ध नगरसेवक तौफिक शेख गेल्या सहा महिन्यांपासून सभेला उपस्थित नाहीत. विजयादशमीपर्यंत (ता. 30) झालेल्या सभेस ते उपस्थित राहिले नाहीत, तर त्यांचे नगरसेवक आपोआप रद्द होणार आहे. 

श्री. शेख हे सध्या स्थानबद्ध असून, सलग दोन महिने गैरहजर राहिल्याने त्यांचे स्थायी समितीचे सदस्यत्व रद्द झाले आहे. तत्पूर्वीच, श्री. शेख यांचे सदस्यत्व रद्द करण्याची घाई नगरसचिव कार्यालयाने सुरू केली होती. हा प्रकार "सकाळ'ने उघडकीस आणल्यावर "तो' प्रस्ताव दफ्तरी दाखल करण्यात आला. त्यानंतर काहीच हालचाल झाली नाही. स्थायी समितीच्या सदस्यपदी राहण्याचा कालावधी संपला तरीही प्रशासनाकडून प्रस्ताव आला नाही. तेव्हा एमआयएमच्या नगरसेवकांनी यासंदर्भात प्रस्ताव दिला होता. 

श्री. शेख मार्चच्या सभेला उपस्थित होते. एप्रिलपासून ते गैरहजर आहेत. एप्रिल ते सप्टेंबरपर्यंत सहा महिन्यांचा कालावधी पूर्ण होतो. त्यानुसार सप्टेंबरच्या विषयपत्रिकेवर प्रशासनाकडून या संदर्भातील विषय येणे अपेक्षित होते. 16 सप्टेंबर रोजी होणाऱ्या नियमित सभेच्या पत्रिकेवर विषय नाही. त्यामुळे नगरसचिव कार्यालयाकडून जाणूनबुजून चालढकल केली जात आहे का, असा प्रश्‍न एमआयएमच्या गोटातून विचारला जात आहे. 

सदस्यत्व का रद्द होणार? 

अधिनियमातील तरतूद 11 (क) नुसार "कोणत्याही कारणाने मग ते महापालिकेने मान्य केले असो वा नसो, लागोपाठ सहा महिन्यांच्या कालावधीत महापालिका सभेस गैरहजर राहिला तर संबंधित नगरसेवकाचे पद आपोआप रद्द झाले असे समजण्यात येईल.' 

काही काळ मिळू शकते जीवदान!
अधिनियमातील तरतूद 11 (क) नुसार एखाद्याचे नगरसेवकपद रद्द झाले आहे का, याविषयी प्रश्‍न उपस्थित करून अन्य सदस्यास तो न्यायाधीशांकडे चौकशीसाठी पाठविता येईल. महापालिकेने विनंती केल्यास आयुक्तांना तो प्रश्‍न न्यायाधीशांकडे पाठविणे बंधनकारक आहे. या प्रकरणाची चौकशी करून न्यायाधीशांनी निर्णय देईपर्यंत संबंधित नगरसेवकाचे सदस्यत्व कायम असेल. या तरतुदीनुसार एमआयएमच्या एखाद्या नगरसेवकाने यासंदर्भात सभेकडे प्रस्ताव दिला आणि सभेने आयुक्तांकडे त्याची शिफारस केली तर श्री. शेख यांचे सदस्यत्व न्यायाधीशांच्या निकालापर्यंत कायम राहू शकते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com