मुलाखत दिल्यानंतर उमेदवारी निश्‍चित हे गणित चुकीचे : राम शिंदे

जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदारसंघासाठी आज इच्छुकांच्या मुलाखती झाल्या. मुलाखत दिली म्हणजे उमेदवारी निश्‍चित झाली असे नाही. आज मुलाखत न दिलेल्या व यापुढेही आमच्या संपर्कात येणाऱ्यांना उमेदवारी दिली जाऊ शकते. एकूणच पक्षामध्ये निवडणूक लढविण्यासाठी इलेक्‍टीव्ह मेरिट महत्त्वाचे असल्याचे मत पणनमंत्री राम शिंदे यांनी व्यक्त केले.
Ram Shinde
Ram Shinde

सोलापूर : जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदारसंघासाठी आज इच्छुकांच्या मुलाखती झाल्या. मुलाखत दिली म्हणजे उमेदवारी निश्‍चित झाली असे नाही. आज मुलाखत न दिलेल्या व यापुढेही आमच्या संपर्कात येणाऱ्यांना उमेदवारी दिली जाऊ शकते. एकूणच पक्षामध्ये निवडणूक लढविण्यासाठी इलेक्‍टीव्ह मेरिट महत्त्वाचे असल्याचे मत पणनमंत्री राम शिंदे यांनी व्यक्त केले. 

शिंदे हे निरीक्षक म्हणून आज सोलापुरात आले होते. त्यांनी आज दिवसभर इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ज्यांनी आज मुलाखती दिल्या आहेत, त्यांच्या सर्व कामकाजाची तपासणी करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. एनजी मिलच्या हेरिटेज वास्तूबाबत विचारले असता त्या इमारती पाडण्याच्या कामास स्थगिती दिली असल्याचेही त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेसाठी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, अविनाश कोळी, राजकुमार पाटील उपस्थित होते. शिंदे यांनी इच्छुक उमेदवारांची यादी दिल्यास कन्फ्युजन वाढत जात असल्याचे कारण देत इच्छुकांची यादी देण्यास नकार दिला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com