दुष्काळी ४० गावातील एकवीस गावांत आमदार भालकेना कमी मताधिक्य

तालुक्यातील दुष्काळी दक्षिण भागातील पाण्याच्या प्रश्नावरून २००९ पासून रणकंदन माजले याच पाणी प्रश्नाचा आ भारत भालके यांचा हॅटट्रीक करण्यात महत्वाचा वाटा असला तरी या भागात भालकेंचे मताधिक्य घटू लागले.
MLA  Bharat Bhalke
MLA Bharat Bhalke

मंगळवेढा : तालुक्यातील दुष्काळी दक्षिण भागातील पाण्याच्या प्रश्नावरून २००९ पासून रणकंदन माजले याच पाणी प्रश्नाचा आ भारत भालके यांना हॅटट्रीक करण्यात महत्वाचा वाटा असला तरी या भागात भालकेंचे मताधिक्य घटू लागले.

या भागातील चाळीस गावाच्या पाण्यासाठी राबवण्यात आलेल्या भोसे प्रादेशिक  पाणीपुरवठा योजनेचा लाभ भालके यांना विधानसभेसाठी झाला असला तरी या गावातून भालकेना जवळपास अडीच हजार पेक्षा अधिक मताधिक्य मिळाले आहे. १९ गावात पहिल्या क्रमांकावर तर १६ गावात दुसऱ्या तर ५ गावात तिसऱ्या क्रमांकावर रहावे लागले. या गावातून जवळपास ५२१०० इतके मतदान झाले. त्यापैकी १७ हजारापेक्षा अधिक मते भालकेना तर सुधाकर परिचारक व समाधान आवताडे हे जवळपास १४ हजार च्या दरम्यान मध्ये मते घेण्यात यशस्वी ठरले.पिढ्यान् पिढ्या दुष्काळी असलेल्या या गावांनी पाण्याच्या प्रश्नावरून २००९ साली  बहिष्कार टाकला होता.यामुळे ही गावे पिण्याच्या पाण्यासाठी अधिक चर्चेत आली.

त्यानंतर भालके यांनी पाठपुरावा करून लोकवर्गणीची अट रद्द करत या चाळीस गावासाठी भोसे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना ७१ कोटी रुपये खर्चून राबवली. उचेठाण येथील या बंधाऱ्यातून जुनोनीच्या माळारानावर जलशुध्दीकरण करून चार झोन च्या माध्यमातून या गावांना पाणी पुरविण्यात आले. २०१४ च्या निवडणुकीत मंगळवेढा उपसा सिंचन योजनेच्या प्रशासकीय मान्यतेच्या  भालकेना फायदा झाला. तरी या निवडणुकीत याच गावातील भगिनींच्या डोक्यावर हंडा कमी करण्यासाठी राबविण्यात आलेली प्रादेशिक पाणीपुरवठा योजना देखील भालके साठी या निवडणुकीतील  प्रचारातील प्रभावी ठरली. 

या निवडणुकीत आमदार भालके यांना महिला वर्गाने  प्रभावी मतदान केले. भालके यांच्या विरोधात परिचारक व आवताडे गटाने आपली ताकद ऐन दिवाळीच्या तोंडावर असलेल्या मोठ्या प्रमाणात लावली. अवताडे व परिचारक यांच्या मतांची बेरीज ही भालकेंसाठी विचार करणारी आहे. निकालानंतर शिरशी, जुनोनी,मेटकरवाडी, हाजापूर, भाळवणी,हुलजंती,निंबोणी, खडकी, नंदेश्वर ,भोसे,रड्डे,पौट,लवंगी, मारोळी,शिरनांदगी,हुन्नुर, रेवेवाडी,महमदाबाद, या गावात आ. भालके हे पहिल्या क्रमांकावर राहिले तर खुपसंगी, मानेवाडी, लेंडवे-चिंचाळे, गोणेवाडी, माळेवाडी, खवे ,सलगर खुर्द,सलगर बुद्रुक,लोणार, पडोळकरवाडी या गावात दुसऱ्या तरहिवरगाव,येड्राव,सोड्डी,शिवनगी,जंगलगी या गावात तिसऱ्या क्रमांकावर राहिले.

भालकें  समोरील आव्हाने
दहा वर्षाच्या कामगिरीमध्ये विधानसभेत मंगळवारच्या सर्वाधिक प्रश्नाबाबत आवाज उठवणारे आमदार भालके यांना या टर्ममध्ये देखील शहरातील क्षेत्र विकास आराखडा,रखडलेले बसवेश्वर ,चोखोबा स्मारक, व मंगळवेढा उपसा सिंचन योजनेतून वगळलेल्या गावाचा समावेश करणे, कर्जमाफी पासून वंचित शेतकय्राला लाभ मिळवून देणे, खरीप २०१८ मधील वंचीत ४०१२  शेतकऱ्यांना तूर पिक विमा मिळवून देणे, रब्बी ज्वारी २०१८ चा विमा मिळवून देणे, रब्बी दुष्काळ निधी २०१८ मध्ये मंगळवेढ्याचा समावेश करणे, या प्रश्नावर आवाज उठवून न्याय मिळवून  देण्याची जबाबदारी येऊन पडली आहे
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com