उपकाराची परतफेड म्हणून शेकापने सांगोल्यात राष्ट्रवादीला पाठिंबा द्यावा : दीपक साळुंखे

केंद्रात पुन्हा मोदी सरकार आल्याने राज्यासह सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे अनेक विद्यामान आमदार आणि नेते भाजप सेनेच्या वाटेवर आहेत. यामध्ये राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष दीपक साळुंखे यांच्याही नावाची जोरदार चर्चा सुरु आहे. या चर्चे विषयी थेट त्यांच्याशी संवाद साधल्यानंतर त्यांनी आपण राष्ट्रवादी सोडणार नाही असल्याचे सांगत, सांगोल्यात शेकापने यावेळी राष्ट्रवादीला पाठिंबा द्यावा अशी मागणी केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
उपकाराची परतफेड म्हणून शेकापने सांगोल्यात राष्ट्रवादीला पाठिंबा द्यावा : दीपक साळुंखे

पंढरपूर : गेल्या 20 वर्षापासून  सांगोला विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादीने शेकापचे ज्येष्ठ नेते आमदार गणपतराव देशमुखांना पाठिंबा देत निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले आहेत. वयोमानुसार त्यांनीच आपण निवडणुक लढवणार नसल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. त्यामुळे आमदार गणपतराव देशमुखांनी येणाऱ्या निवडणुकीत आज पर्यंत केलेल्या उपकाराची परत फेड म्हणून  राष्ट्रवादीला पाठिंबा द्यावा, अशी आपण गणपराव देशमुखांकडे मागणी केली आहे,अशी माहिती सोलापूर जिल्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष दीपक साळुंखे यांनी आज 'सरकारनामा'शी बोलताना दिली.

केंद्रात पुन्हा मोदी सरकार आल्याने राज्यासह सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी  आणि काँग्रेसचे अनेक विद्यामान आमदार आणि नेते भाजप सेनेच्या वाटेवर आहेत. यामध्ये राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष दीपक साळुंखे यांच्याही  नावाची जोरदार चर्चा सुरु आहे. या चर्चे विषयी थेट त्यांच्याशी संवाद साधल्यानंतर त्यांनी आपण राष्ट्रवादी सोडणार नाही असल्याचे सांगत, सांगोल्यात शेकापने यावेळी राष्ट्रवादीला पाठिंबा द्यावा अशी मागणी केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

साळुंखे म्हणाले, ''केंद्रात आणि राज्यात भाजप सरकार आहे. सत्तेसाठी अनेक नेते पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत.सध्यातरी  पक्ष सोडण्याचा माझा कोणताही विचार नाही. परंतु येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मी  निवडणूक लढवावी असा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. त्या दृष्टीने कार्यकर्त्यांशी व मतदारांशी संवाद सुरु आहे.''

सांगोला विधानसभा मतदार संघावर आमदार गणपतराव देशमुखांचे आणि शेकापचे गेल्या 55 वर्षाहून अधिक काळ वर्चस्व आहे. 1995 च्या निवडणुकीतील पराभवाचा अपवाद वगळतात आमदार गणपतराव देशमुखांनी  1962 ते 2014 पर्यंत सांगोल्यातून  निवडून येणाच्या विक्रम केला आहे. सध्या त्यांचे वय जवळपास 93 वर्षे झाले आहे. वयोमानामुळे त्यांना फिरणे आणि काम करणे शक्य होत नाही. त्यामुळे त्यांनी स्वतःहून आगामी विधानसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय जाहीर केला आहे.  त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत आमदार गणपतराव देशमुखांनी आज पर्यंत राष्ट्रवादीने केलेल्या मदतीची आणि उपकाराची  उताराई म्हणून राष्ट्रवादीला पाठिंबा द्यावा, अशी आमची अपेक्षा असल्याचेही साळुंखे यांनी सांगितले.  गणपतराव देशमुख राष्ट्रवादीला पाठिंबा देणार की शेकापचा अन्य उमेदवार निवडणुकीला उभे करणार याकडेच संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com