बागलांच्या फेसबुक वॉलवर म्हटलंय... शिवबंधन उचलण्याची वेळ आलीय...! 

करमाळ्यातील राष्ट्रवादीच्या प्रमुख कार्यकर्त्या रश्‍मी बागल यांनी येत्या सोमवारी (ता. 19) कार्यकर्त्यांची महत्त्वाची बैठक बोलावली आहे. त्याच अनुशंगाने त्यांचे बंधु युवा नेते दिग्विजय बागल यांनी त्यांच्या फेसबुक वॉलवर "शिवबंधन हाती उचलण्याची वेळ आली आहे... शिवसेना आपल्याला तिकीट द्यायला तयार आहे...'' त्यांनी असं म्हटलं असल्याने त्यांचा शिवसेनेतील प्रवेश निश्‍चित मानला जात आहे.
बागलांच्या फेसबुक वॉलवर म्हटलंय... शिवबंधन उचलण्याची वेळ आलीय...! 

सोलापूर  : करमाळ्यातील राष्ट्रवादीच्या प्रमुख कार्यकर्त्या रश्‍मी बागल यांनी येत्या सोमवारी (ता. 19) कार्यकर्त्यांची महत्त्वाची बैठक बोलावली आहे. त्याच अनुशंगाने त्यांचे बंधु युवा नेते दिग्विजय बागल यांनी त्यांच्या फेसबुक वॉलवर "शिवबंधन हाती उचलण्याची वेळ आली आहे... शिवसेना आपल्याला तिकीट द्यायला तयार आहे...'' त्यांनी असं म्हटलं असल्याने त्यांचा शिवसेनेतील प्रवेश निश्‍चित मानला जात आहे. 

राष्ट्रवादीत बागल गटाची होणारी अडवणूक, पक्ष वाढीसाठी आमदार नारायण पाटील यांनी काय प्रयत्न केले? याबाबत यानिमित्ताने चर्चा सुरु झाली आहे. तर दुसरीकडे तुम्ही शिवसेनेत गेला, तरी आम्ही राष्ट्रवादीतच राहणार असाही सोशल मिडीयावर एक गट तयार झाला आहे.

दरम्यान, गेल्या विधानसभा निवडणुकीत रश्‍मी बागल व नारायण पाटील या दोघांच्या मतामध्ये जास्त फरक नव्हता. तालुक्‍यात गट म्हणून बागल गट मजबूत आहे. सर्वजण निवडणूकीत स्वतंत्र लढले तर बागल यांचा विजय निश्‍चित होऊ शकतो. त्यामुळे शिवसेना बागल यांना प्रवेश देऊन तिकीट देईल, अशी चर्चा आहे. 

कारखान्यासाठी पक्षांतराची चर्चा
रश्‍मी बागल या विधानसभा निवडणूक लढवणार हे आधीपासूनच निश्‍चित आहे. करमाळा तालुक्‍यातील मकाई सहकार साखर कारखाना व अदिनाथ सहकारी साखर कारखाना सध्या त्यांच्या ताब्यात आहे. मात्र उस वाहतूकदार, शेतकरी व कामगारांची देणी राहिल्यामुळे त्यांच्यावर रोष आहे. भर सभेतही त्यांना याबाबत जाब विचारला जात आहे, अशा स्थितीतही 'कोणाचिही देणी ठेवणार नाही', असं आश्‍वासन त्या देत आहेत.

कारखान्याला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी मदतच पाहिजे असेल तर त्या भाजपमध्येही जाऊ शकतात. शिवसेनेपेक्षा भाजप त्यांना यातून लवकर बाहेर काढू शकेल. भाजपचे दोन्ही कारखान्यात तज्ज्ञ संचालक आहेत. कारखाना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी त्यांनी राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांकडे सुद्धा पाठपुरावा केला, मात्र त्यात त्यांना पाहिजे, तसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे निराश झालेल्या बागल यांना सध्या आमदारकी महत्वाची आहे. आणि त्या दृष्टीने त्या शिवसेनेत प्रवेश करुन तिकीट मिळवू इच्छीत असतील अशी चर्चा आहे. 

आमदार पाटलांनी शिवसेनेसाठी काय केले..?
करमाळ्यातील शिवसेनेचे आमदार नारायण पाटील यांनी पाच वर्षात विकास कामे केली असली तरी पाहिजे त्याप्रमाणात तालुक्‍यात शिवसेनेचा विस्तार आणि प्रचार केला नाही. निष्ठावंत शिवसैनिकांना त्यांनी विश्‍वासात घेतले नाही. स्वत: साठी म्हणून त्यांनी शिवसेनेचा वापर केला. ते शिवसेनेत असले तरी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहीते पाटील यांच्या संपर्कात होते. मोहिते पाटील यांना मानणे हीच गोष्ट सध्या त्यांच्याबाबत चर्चेत होती.

गावागावांमध्ये शाखा वाढवण्यात व शिवसेनेचे कार्यकर्ते वाढवण्यात त्यांना पाहिजे तसं यश आले नाही. करमाळा शहरात त्यांचे कार्यालयही नाही. तालुक्‍यात आलेल्या सामान्य कार्यकर्त्यांनाही त्यांच्या भेटीसाठी जेऊरला जावे लागते, याबाबत त्यांच्यावर नाराजी आहे. मोहिते पाटील यांच्या जवळकीबाबत जलसंधारणमंत्री तानाजी सावंत यांनी जाहीर सभेत कानउडणी केली होती. त्याचाच फटका पाटील यांना तिकीटाबाबत बसण्याची शक्‍यता आहे, असं बोलले जात आहे. 

आमदार शिवसेनेचाच होणार असल्याची चर्चा
करमाळा तालुक्‍यात 15- 20 वर्षात अपवाद वगळता शिवसेनेचाच आमदार झाला. बागल गटाचे श्रद्धास्थान असलेले (कै.) दिंगाबर बागल हे शिवसेनापुरस्कृत म्हणून विधानसभेत निवडून आले होते. त्यानंतर माजी आमदार जयवंतराव जगताप हेही शिवसेनेचे आमदार म्हणून निवडून आले होते. गेल्या विधानसभेत नारायण पाटील हे शिवसेनेकडून निवडून आले. आता रश्‍मी बागल या शिवसेनेत गेल्या आणि त्यांना तिकीट मिळाले, तर त्याही आमदार होणारच अशी चर्चा आहे.

रश्मी बागल

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com