Solapur News - Bacchu kadu | Sarkarnama

...तर मुख्यमंत्र्यांना आठवेल विठ्ठल - बच्चू कडू

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 4 जुलै 2017

कर्जमाफी ही मलमपट्टी असून शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव दिला पाहिजे. त्यासाठी शेतकरी पेटला पाहिजे, तरच आंदोलनाला धार येणार आहे. पंढरीला जाणारा वारकरी जेव्हा मंत्रालयावर धडकेल; तेव्हाच मुख्यमंत्र्यांना पांडुरंग आठवेल, अशी टीका आमदार बच्चू कडू यांनी केली.

भोसे (पंढरपूर) - कर्जमाफी ही मलमपट्टी असून शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव दिला पाहिजे. त्यासाठी शेतकरी पेटला पाहिजे, तरच आंदोलनाला धार येणार आहे. पंढरीला जाणारा वारकरी जेव्हा मंत्रालयावर धडकेल; तेव्हाच मुख्यमंत्र्यांना पांडुरंग आठवेल, अशी टीका आमदार बच्चू कडू यांनी केली.

आमदार कडू आज पंढरपूर दौऱ्यावर आले होते. येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना कडू म्हणाले, ""कर्जमाफीचा निर्णय हा संभ्रम करणारा असल्याने सुकाणू समितीने तो मान्य केलेला नाही. त्यासाठी 10 जुलैपासून राज्यभर जनजागरण यात्रा काढणार आहे. यामध्ये शेतकऱ्यांसमोर शासन निर्णयाची पोलखोल करणार आहे. संतांचे कार्य हे पांडुरंगापुरते मर्यादित नसून ते शेतकऱ्यांपर्यंत आहे. संत तुकाराम महाराज यांनी पहिल्यांदा कर्जमाफी केली होती. असे सांगून मुख्यमंत्र्यांना पांडुरंगाची पूजा करण्यापासून रोखू नका; निदान पूजेनंतर तरी पांडुरंग त्यांना सरसकट कर्जमाफी करण्याची सद्‌बुद्धी देईल, असे ते म्हणाले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख