विधानसभेच्या तोंडावर मोहिते पाटलांच्या भुमिकेकडे लक्ष

जिल्ह्याच्या राजकारणात मोहिते पाटील यांचे वर्चस्व होतं. मात्र, आता ते कमी होताना दिसत आहे. जिल्ह्यात विधानसभेच्या तोंडावर जोरदार पक्षांतरे सुरु असताना विजय दादांचे नाव माळशिरस व करमाळा वगळता इतर ठिकाणी जास्त घेतले जात नसल्याचे चित्र आहे. मग मोहिते पाटील शांत की भाजपकडून खच्चीकरण केले जात आहे असा प्रश्न चर्चिला जाऊ लागला आहे.
Vijaysinh Mohite Patil
Vijaysinh Mohite Patil

सोलापूर : माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहीते पाटील यांच्या परिवारातील कोणी भाजपच्या कार्यक्रमात किंवा कोणत्या व्यासपीठावरही दिसतही नाहीत. त्यातच त्यांनी अजून अधिकृतपणे राष्ट्रवादी सोडली नसल्याचे प्रतिपादन विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले आहे. त्यामुळे मोहिते पाटील यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

जिल्ह्याच्या राजकारणात मोहिते पाटील यांचे वर्चस्व होतं. मात्र, आता ते कमी होताना दिसत आहे. जिल्ह्यात विधानसभेच्या तोंडावर जोरदार पक्षांतरे सुरु असताना विजय दादांचे नाव माळशिरस व करमाळा वगळता इतर ठिकाणी जास्त घेतले जात नसल्याचे चित्र आहे. मग मोहिते पाटील शांत की भाजपकडून खच्चीकरण केले जात आहे असा प्रश्न चर्चिला जाऊ लागला आहे.

लोकसभा निवडणूकीत माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजप प्रवेश केला. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत विजयसिंह मोहिते पाटील व्यासपीठावर गेले. पण राष्ट्रवादीला रामराम न भाजपातही त्यांनी अधिकृतपणे प्रवेश केला नाही. भाजप आणि राष्ट्रवादी या दोन्ही डगरीवर त्यांचा हात असून विधानसभेच्या तोंडावर त्यांची भूमिका अस्पष्ट आहे.

कृष्णा भीमा स्थिरीकरण या महत्त्वकंक्षी प्रकल्पाचे कारण करत माजी खासदार मोहिते पाटील यांनी भाजप प्रवेश केला होता. परंतु अधिवेशनादरम्यान हा प्रकल्प होणे शक्य नसल्याचे प्रतिज्ञापत्र भाजप सरकारचे जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांनी न्यायालयात दिले असल्याचे जयंत पाटील यांनी माळशिरस येथे 'शिवस्वराज्य' यात्रेत सांगितले आहे. त्यामुळे हा प्रकल्प होणार की नाही, भाजपने दिशाभूल तर केली नाही ना असे तर्कवितरक लावले जात आहेत. त्यातच शिखर बँकेच्या गैरव्यहवार प्रकरणात मोहिते पाटील यांचेही नाव असल्याने मोहिते पाटील यांचे भाजपकडून खचिकरण केले जात असल्याची चर्चा आहे.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर दमदार नेते भाजपच्या वाटेवर आहेत. करमाळ्यातील रश्मी बागल, माजी आमदार दिलीप माने, बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. करमाळ्याचे आमदार नारायण पाटील यांना तर मोहिते पाटील यांची जवळीकच आडचणीत आणण्याची शक्यता आहे. जलसंधारण मंत्री शिवसेनेचे नेते प्रा. तानाजी सावंत यांनी आमदार पाटील यांना तसा भर सभेत दमही भरला होता. जिल्ह्यातील बदललेली राजकीय समिकरणे आणी वेगवेळ्या प्रकारच्या सुरु असलेल्या खेळीत मोहिते पाटील यांची नेमकी भुमिका काय आणि ते सध्या कोणत्या पक्षाचे हा प्रश्न राजकीय पटलावर केला जाऊ लागला आहे.

मोहिते पाटील- सावंत यांचा जिल्ह्यात नवा वाद
जिल्ह्याच्या राजकारणात वर्चस्व रहावे म्हणून काही दिवसांपासून माढ्याचे शिंदे व अकलुजचे माहिते पाटील यांच्यात राजकीय वाद आहे. हा सर्वांना माहिती आहे. पण आता मोहिते- सावंत असा नविन राजकीय वाद निर्माण होऊ लागला आहे. करमाळ्याचे आमदार पाटील यांना 'अकलुजकरांचे उंबरठे झिजवू नका', असं मंत्री सावंत यांनी केलेलं वक्तव्य हे त्याचे उदाहरण आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com