राष्ट्रवादीत युवकांनी तुफान भरलंया...कोते पाटलांचा चढता आलेख!  - solapur ncp youth organisation | Politics Marathi News - Sarkarnama

राष्ट्रवादीत युवकांनी तुफान भरलंया...कोते पाटलांचा चढता आलेख! 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 10 फेब्रुवारी 2018

राज्यातील महत्त्वाच्या राजकीय पक्षांची युवा फळी ढेपाळलेली दिसत असताना राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसची युवा फळी मात्र आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून सक्रिय झाल्याचे दिसत आहे. सत्तेवर येण्यापूर्वी भाजपने दिलेली आश्‍वासने आणि सध्या देशात असलेली स्थिती अक्रोशच्या माध्यमातून चव्हाट्यावर आणण्यासाठी राष्ट्रवादीची युवा फळी सरसावली आहे. यानिमित्ताने प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते-पाटील यांनी युवा फळीत तुफान भरलं आहे. 

सोलापूर : राज्यातील महत्त्वाच्या राजकीय पक्षांची युवा फळी ढेपाळलेली दिसत असताना राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसची युवा फळी मात्र आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून सक्रिय झाल्याचे दिसत आहे. सत्तेवर येण्यापूर्वी भाजपने दिलेली आश्‍वासने आणि सध्या देशात असलेली स्थिती अक्रोशच्या माध्यमातून चव्हाट्यावर आणण्यासाठी राष्ट्रवादीची युवा फळी सरसावली आहे. यानिमित्ताने प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते-पाटील यांनी युवा फळीत तुफान भरलं आहे. 

प्रदेशाध्यक्ष कोते-पाटील यांनी राष्ट्रवादीच्या विद्यार्थी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करताना राज्यभर 43 मोर्चे काढले. दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ व्हावे व राज्यातील विद्यापीठांची उपकेंद्र व्हावीत या प्रमुख मागण्यांसाठी त्यांनी मोर्च्यांच्या माध्यमातून महाराष्ट्र ढवळून काढला. त्यांच्या या कामगिरीची दखल घेत कोते पाटील यांनी विद्यार्थीवरून युवकच्या प्रदेशाध्यक्षपदी बढतीही देण्यात आली. आता बेरोजगार युवकांच्या प्रश्‍नासाठी कोते पाटील यांनी पश्‍चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे या जिल्ह्यातून आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून युवकांना परिवर्तनाच्या वाटेवर आणले आहे. एकीकडे राष्ट्रवादीची फादर बॉडी हल्लाबोल करत असताना दुसरीकडे युवकांनी मांडलेला आक्रोश सत्ताधाऱ्यांची झोपा उडविण्यास सुरवात करू लागला आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख