Solapur NCP Crisis | Sarkarnama

सोलापुरातील पराभवाच्या धक्‍क्‍यातून सावरेना राष्ट्रवादी कॉंग्रेस 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 12 मे 2017

सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीत झालेला दारुण पराभव, जिल्हा परिषदेत अध्यक्ष पदाची संधी असतानाही आलेले मोठे अपयश या सर्वांमुळे सोलापूर शहर व जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेस व राष्ट्रवादीचे नेते अद्यापही पराभवाच्या धक्‍क्‍यातून बाहेर आलेले नाहीत.

सोलापूर : सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीत झालेला दारुण पराभव, जिल्हा परिषदेत अध्यक्ष पदाची संधी असतानाही आलेले मोठे अपयश या सर्वांमुळे सोलापूर शहर व जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेस व राष्ट्रवादीचे नेते अद्यापही पराभवाच्या धक्‍क्‍यातून बाहेर आलेले नाहीत. प्रदेश पातळीवरूनही संघटनात्मक बांधणीच्या दृष्टिकोनातून काहीच हालचाली होताना दिसत नाहीत. 

2019 मध्ये होणारी लोकसभा व विधानसभा निवडणूक राष्ट्रवादीच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. महत्वापेक्षा अस्तित्वाची लढाई आहे. माढ्याची खासदारकी आणि जिल्ह्यातील माळशिरस, माढा, मोहोळ व बार्शी विधानसभा मतदारसंघाच्या रूपाने चार आमदार राष्ट्रवादीचे आहेत. जिल्हा परिषद-पंचायत समिती व नगरपरिषदेच्या निवडणुकीचे निकाल पाहता येत्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीची स्थिती आणखी बिकट होण्याची शक्‍यता आहे. 2019 ची लोकसभा व विधानसभा निवडणूक राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई असणार आहे. हे अस्तित्व टिकविण्यासाठी पक्षात आवश्‍यक असलेले कार्य सध्या होताना दिसत नाही. 

पराभवाच्या नैराश्‍यातून आलेली मरगळ न झटकल्याने कार्यकर्त्यांचा नेत्यांना आणि नेत्यांचा कार्यकर्त्यांना कोठेच मेळ लागताना दिसत नाही. शेतकरी कर्जमाफी आणि तूर खरेदीच्या मुद्याने सध्या वातावरण तापले असताना सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते व कार्यकर्ते शांत आहेत. संधी असतानाही शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर राष्ट्रवादी बघ्याच्या भूमिकेत आहेत. सोलापूर शहरातील राष्ट्रवादीची स्थिती याहूनही बिकट आहे. यंदाच्या महापालिकेत चारच जागा निवडून आल्याने पक्षाच्या अस्तित्वाबद्दल प्रश्‍नचिन्ह निर्माण होत आहे. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख