कॉंग्रेसच्या गुलामगिरीतून मुक्‍त व्हा - ओवैसी

शहर मध्यचे एमआयएमचे उमदेवार फारूख शाब्दी यांनी खासदार असदुद्दीन ओवैसी यांना बोलावून आवर्जुन सभा घ्यायला लावली.
कॉंग्रेसच्या गुलामगिरीतून मुक्‍त व्हा - ओवैसी

सोलापूर  : शहर मध्यचे एमआयएमचे उमदेवार फारूख शाब्दी यांनी खासदार असदुद्दीन ओवैसी यांना बोलावून आवर्जुन सभा घ्यायला लावली. 

दरम्यान, या सभेत शाब्दींनी म्हणाले, तौफिक शेख यांना तांत्रिक कारणास्तव उमेदवारी मिळू शकली नाही. माझी उमेदवारी तौफिक शेख यांना विचारुनच फिक्‍स झाली आहे. काही लोक जाणिवपूर्वक अफवा पसरवत आहेत. मी परराज्यातील अथवा परदेशातील उमेदवार नसून अक्‍कलकोटचाच असल्याचेही शाब्दींनी या सभेतून त्यांनी स्पष्ट केले.

भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या तर राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या सभांचे नियोजन करण्यात आले आहे. 

शिवसेना उमेदवारांच्या प्रचारानिमित्त उध्दव ठाकरे यांच्याही सभा होणार असून कॉंग्रेस उमेदवारांनी प्रियंका गांधी यांना बोलावण्याचे नियोजन केल्याची चर्चा आहे. 

या पार्श्‍वभूमीवर शाब्दी यांनी खासदार ओवैसी यांना दुसऱ्यांदाही बोलावले आहे आणि त्याला ओवैसी यांनी होकार दिला आहे. मुस्लीमांची निर्णायक मते असलेल्या शहर मध्य मतदारसंघात कॉंग्रेसकडून आमदार प्रणिती शिंदे, शिवसेनेकडून माजी आमदार दिलीप माने, बंडखोर उमेदवार महेश कोठे, माकपकडून माजी आमदार नरसय्या आडम आणि एमआयएमतर्फे शाब्दी निवडणूक लढवित आहेत. जिल्ह्यातील सर्वाधिक चुरशीची लढत याच मतदारसंघात पहायला मिळणार आहे. प्रत्येक उमेदवार आपापल्या पक्षातील दिग्गजांना आणण्याचे नियोजन करु लागल्याचे चित्र आहे. त्यामुळे नेमका कोणता उमेदवार बाजी मारणार याची उत्सुकता लागली आहे.

ओवैसींनी भरला मुस्लीम जेष्ठांना दम 

लोकसभा निवडणुकीत वंचित बहूजन आघाडीचे उमेदवार ऍड. प्रकाश आंबेडकर यांना मते देण्याचे आवाहन सर्वांना केले. मात्र, मुस्लीम समाजातील ज्येष्ठांनी ओवैसी याला काय कळते, तो नुसताच सांगून जातो असे म्हणून टीका केल्याचे समजले. मात्र, मागील 70 वर्षात नेहरु, गांधी, शास्त्री, मनमोहन सिंग, सुशिलकुमार शिंदे यांना मतदान करुनही मुस्लीमांवरील अन्याय कमी झालेत का, याचा अभ्यास मुस्लीम समाजातील ज्येष्ठांनी करावा. त्यांना मतदान करण्यासाठीच आपला जन्म झाला नसून तरुणांच्या चेहऱ्याकडे पाहून त्यांनी आतातरी मत बदलावे म्हणून जोरदार हल्ला चढविला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com