`याला' बाळासाहेब शेळकेंचा भाबडेपणा म्हणायचा का ? 

राजकारणात दिलेले शब्द पाळले जात नाहीत याचा अनुभव मला आज आला आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती निवडीबाबत जे ठरले होते ते झाले नाही.- बाळासाहेब शेळके
`याला' बाळासाहेब शेळकेंचा भाबडेपणा म्हणायचा का ? 

सोलापूर : राजकारणात दिलेले शब्द पाळले जात नाहीत याचा अनुभव मला आज आला आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती निवडीबाबत जे ठरले होते ते झाले नाही. बाजार समितीत आम्ही मिळून आहोत. परंतु कार्यकर्त्यांच्या भावना विचारात घेऊन दक्षिण सोलापूर तालुक्‍याच्या हिताचा निर्णय पुढील काळात घेऊ, अशी माहिती बाजार समितीचे संचालक बाळासाहेब शेळके यांनी दिली. 

कॉंग्रेसचे वर्चस्व राहिलेल्या सोलापूर बाजार समितीवर आज पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांची सभापती म्हणून बिनविरोध निवड झाली. कॉंग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांनी राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते. या पदासाठी कॉंग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके इच्छुक होते. 

शेळके यांच्याऐवजी पालकमंत्री देशमुख यांना आयत्या वेळी संधी मिळाल्याने सोलापूर कॉंग्रेसमध्ये आणखी एक मोठा धक्का बसला आहे. 

सोलापूर लोकसभा मतदारसंघातून सुशीलकुमार शिंदे यांचा दारुण पराभव झाल्यानंतर आता विधानसभेच्या तोंडावर कॉंग्रेसमधील दुफळी आणखी वाढल्याची चिन्हे दिसत आहेत. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com