Solapur Congress Chief may be changed | Sarkarnama

सोलापूर शहर काँग्रेस नेतृत्व बदलाचे संकेत; सुशीलकुमार घेणार निर्णय

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 13 मार्च 2017

सोलापूर - महापालिका निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवाच्या पार्श्वभुमीवर कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल याना बदलण्याची मागणी होवू लागली आहे. तर राजीनामा केंव्हाच तयार ठेवला आहे असे खरटमल यांचे म्हणणे आहे. या पार्श्वभुमीवर माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे मंगळवारी काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महापालिकेत 40 वर्षे सत्तेवर असलेल्या काँग्रेसला यंदा फक्त 14 जागा मिळवता आल्या आहेत. विरोधी पक्षनेता मिळण्याची संधीही शिवसेनेने पळविल्याने काँग्रेसच्या नगरसेवकाना कार्यालाही मिळणे अवघड झाले आहे. या घडामोडीमुळे काँग्रेस कार्यकर्त्यामध्ये नाराजी वाढली असून त्याचीच परिणीती खरटमल यांच्या राजीनामा मागण्यामध्ये झाली आहे. आता शिंदे हे खरटमल यांनाच कायम ठेवतात की नेतृत्व बदल करतात हे मंगळवारीच स्पष्ट होइल.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख