सोलापुरात डिनर डिप्लोमसी; चंद्रकांतदादा-महेशअण्णा यांच्यात विधानसभेची चर्चा

महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह दोन्ही मंत्र्यांना आमच्या घरी जेवणाला बोलाविले होते. आयटी पार्कच्या भूमिपूजनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वेळ मिळवून देतो, असे महसूलमंत्री पाटील यांनी यावेळी सांगितले आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सलगर वस्ती परिसरात आयटी पार्कचे भूमिपूजन करायचे आहे. विधानसभेच्या अनुषंगानेही यावेळी चर्चा झाली.- महेश कोठे, जिल्हाप्रमुख, शिवसेना
सोलापुरात डिनर डिप्लोमसी; चंद्रकांतदादा-महेशअण्णा यांच्यात विधानसभेची चर्चा

सोलापूर : सलगरवस्ती परिसरात शिवसेना जिल्हाप्रमुख महेशअण्णा कोठे यांच्या जागेवर प्रस्तावित असलेल्या आयटी पार्कच्या भूमिपूजनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बोलाविण्यात येणार आहे. मुख्यमंत्र्यांची वेळ घेऊन देण्याचा शब्द भाजपचे नेते, महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिला आहे. 

कोठे यांच्या राधाश्री निवासस्थानी झालेल्या स्नेहभोजनावेळी आयटी पार्कसह विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा झाली. 

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख, महापालिकेतील विरोधी पक्षनेते महेश कोठे यांच्या राधाश्री निवासस्थानी भारतीय जनता पार्टीचे नेते, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, सहकारमंत्री सुभाष देशमुख, महापौर शोभा बनशेट्टी यांनी शुक्रवारी रात्री स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला. यावेळी आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा झाली. 

शहर मध्य मतदारसंघासह सोलापूर दक्षिण आणि शहर उत्तर मतदारसंघातील उमेदवार निवडून आणण्याविषयी विचारमंथन झाले. 

कोठे यांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना यापूर्वीच घरी जेवणाचे निमंत्रण दिले होते. शुक्रवारी सोलापूर दौऱ्यावर आल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी पत्नीसह कोठे यांच्या घरी जाऊन स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला. कोठे यांच्या निमंत्रणाला मान देऊन पालकमंत्री विजयकुमार देशमुख, सहकारमंत्री सुभाष देशमुख, महापौर शोभा बनशेट्टी यांनी स्नेहभोजनाचा आनंद घेतला. शहरातील तीनही उमेदवार निवडून आले पाहिजेत, असे पाटील यांनी कोठे यांना सांगितले आहे. मध्य मतदारसंघातून कोठे यांना निवडणून आणण्यासाठी यावेळी सकारात्मक चर्चा झाली. 

महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह दोन्ही मंत्र्यांना आमच्या घरी जेवणाला बोलाविले होते. आयटी पार्कच्या भूमिपूजनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वेळ मिळवून देतो, असे महसूलमंत्री पाटील यांनी यावेळी सांगितले आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सलगर वस्ती परिसरात आयटी पार्कचे भूमिपूजन करायचे आहे. विधानसभेच्या अनुषंगानेही यावेळी चर्चा झाली. 
- महेश कोठे, जिल्हाप्रमुख, शिवसेना

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com