जलसंधारणमंत्री गडाख दुचाकीवरून संकटग्रस्तांच्या वस्तीवर

सायरनचा आवाज, पोलिस बंदोबस्त, मागे-पुढे अधिकारी-कर्मचारी, स्वीय सहायक व कार्यकर्ते, असा सगळा लवाजमा बाजूला ठेवत जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांनी खरवंडी रस्त्यावरील डवरी गोसावी समाजाच्या वस्तीला दुचाकीवर जाऊन भेट दिली. "घाबरू नका, कोरोनाच्या संकटावर आपण मात करू,' असा धीर त्यांना दिला. त्यांच्या या साधेपणाचे ग्रामस्थांनी कौतुक केले.
 Soil and Water Conservation minister Shankarrao Gadakh visits remote village in nagar district
Soil and Water Conservation minister Shankarrao Gadakh visits remote village in nagar district

सोनई : सायरनचा आवाज, पोलिस बंदोबस्त, मागे-पुढे अधिकारी-कर्मचारी, स्वीय सहायक व कार्यकर्ते, असा सगळा लवाजमा बाजूला ठेवत जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांनी खरवंडी रस्त्यावरील डवरी गोसावी समाजाच्या वस्तीला दुचाकीवर जाऊन भेट दिली. "घाबरू नका, कोरोनाच्या संकटावर आपण मात करू,' असा धीर त्यांना दिला. त्यांच्या या साधेपणाचे ग्रामस्थांनी कौतुक केले.

सोनई येथील कार्यकर्ते संतोष क्षीरसागर यांच्या दुचाकीवर बसून मंत्री गडाख यांनी खरवंडी रस्त्यावरील डवरी गोसावी समाजाच्या वस्तीला भेट दिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 15 कुटुंबांची अडचण जाणून घेतली. नामदेव सावंत, मोहन शेगर, साहेबराव शिंदे, भागाबाई सावंत, रुपाबाई शिंदे यांनी कोरोनामुळे उपासमारीची वेळ आल्याचे सांगितले.

मंत्री म्हटलं, की मागे-पुढे पोलिस वाहनांची गर्दी, सायरनचा आवाज, संबंधित खात्याचे अधिकारी व वजनदार कार्यकर्त्यांचा लवाजमा असतो. आज सकाळी मंत्री गडाख यांनी अतिशय साध्या पद्धतीने वस्तीतील कुटुंबांच्या घरोघर जाऊन त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. मागील आठवड्यात गडाख यांनी स्वत:चा बंदोबस्त कोरोना प्रतिबंधासाठी देण्याचा आगळा-वेगळा निर्णय घेतला होता.
मंत्री गडाख यांनी भेट दिल्याने मोठा धीर आला. त्यांना रेशन कार्ड, रस्ता, पाण्याची समस्या सांगितली. त्यांनीही लवकरच आमचे प्रश्न मार्गी लागण्याचे आश्‍वासन दिले, असे तेथील नामदेव सावंत यांनी सांगितले.

मुख्यमंत्री काैशल्याने परिस्थिती हाताळतात
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अतिशय कौशल्याने कोरोनामुळे उद्‌भवलेली परिस्थिती हाताळत आहेत. या संकटाचा सामना करताना, सर्वांनीच गंभीर राहणे गरजेचे आहे. सर्वांचीच अडचण आणि समस्या झाली आहे. सरकार सर्व बाबींवर लक्ष ठेवून आहे. घरात राहा, सुरक्षित राहा, असे मंत्री गडाख यांनी लोकांना सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com