Social Media War Over Tukaram Mundhe's Resolution | Sarkarnama

भाजप नेते-कार्यकर्ते व तुकाराम मुंढे प्रेमींमध्ये सोशल मिडिया वाॅर

सरकारनामा ब्युरो 
बुधवार, 29 ऑगस्ट 2018

मुंढे यांच्या विरोधातील अविश्‍वास प्रस्तावाला नगरसेवकांबरोबरच करवाढीमुळे त्रस्त असलेले शेतकरी, प्रशासकीय शिस्तीची धग बसलेल्या कर्मचारी संघटनांनी पाठींबा दिला आहे. त्यामुळे शहरात पाऊस थांबला असला तरीह मुंढे यांचे समर्थक आणि विरोधात दोन्ही बाजुंच्या पोस्टचा पाऊस पडला

नाशिक : नाशिक महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या समर्थनासाठी सोशल मिडीयावर आज नेटकरी अॅक्‍टीव्ह झाले. नगरसेवक, महापालिका पदाधिकाऱ्यांनीही त्याला तेव्हढ्याच नेटाने विरोध सुरु केला. भाजपचे नेते कार्यकर्त्यांनी विविध निवेदने व पोस्ट व्हायरल केल्या आहेत. यामध्ये त्यांनी 'मुंढेंचे समर्थन करुन पायावर दगड पाडून घेऊ नका. ते शिस्तप्रिय व कार्यक्षम नसुन कृतघ्न, अहंकारी अधिकारी आहेत.' असे म्हटले आहे. त्यामुळे ही पोस्ट चर्चेचा विषय ठरली आहे.  

तुकाराम मुंढे यांच्या समर्थनासाठी नेटकरी पुढे सरसावले. शुक्रवारी (ता. 31) गोल्फ क्‍लब जॉगींग ट्रॅकवर 'वॉक फॉर कमिशनर' हा कार्यक्रम होणार आहे. दिवसभरात तिनशेहून अधिक नागरिकांनी समर्थन व विरोधात मुंढे यांच्या हॅशटॅगवर अशा पोस्ट व्हायरल केल्या. यासंदर्भात आज दिवसभर महापौरांचे निवासस्थान असलेल्या रामायण बंगल्यावर महापौर रंजना भानसी, सभागृह नेते दिनकर पाटील, गटनेते संभाजी मोरुस्कर, विविध पदाधिकारी दिवसभर नगरसेवकांची मते जाणून घेत होते. 

मुंढे यांच्या विरोधातील अविश्‍वास प्रस्तावाला नगरसेवकांबरोबरच करवाढीमुळे त्रस्त असलेले शेतकरी, प्रशासकीय शिस्तीची धग बसलेल्या कर्मचारी संघटनांनी पाठींबा दिला आहे. त्यामुळे शहरात पाऊस थांबला असला तरीह मुंढे यांचे समर्थक आणि विरोधात दोन्ही बाजुंच्या पोस्टचा पाऊस पडला. मुन्ना शेख या समर्थकाच्या पोस्टमध्ये, 'नाशिकच्या नागरिकांसाठी सर्व नगरसेवक मुंढे यांच्या विरोधात उतरले आहेत. करवाढ ही केवळ नगरसेवकांच्या घराला झालेली नाही. सर्वांच्या घरांना झाली. त्यामुळे तुकाराम मुंढेंना हटवण्यासाठी सगळ्यांनी एकत्र या. अजिबात समर्थन करु नका. ठरावाचा विरोध करुन पायावर दगड पाडून घेऊ नका. ते शिस्तप्रिय, कार्यक्षम नाहीत तर अहंकारी अधिकारी आहेत,' असे म्हटले आहे.  

एरव्ही एकमेकांवर राजकीय आरोपांची धुळवड करणारे नगरसेवक पक्ष, पद व प्रभाग विसरुन पहिल्यांदाच सोशल मिडीयावर एकमताने तुकाराम मुंढेच्या विरोधात एकत्र आल्याचे चित्र आहेत. मुंढेंच्या कार्यपध्दतीने एरव्ही प्रत्येक प्रश्‍नावर तावातावाने भांडणारे नगरसेवक पक्षभेद विसरुन एकत्र आल्याचे चित्र आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख