इटलीच्या मॅडम होणार आता वाघांची मावशी!

बदलत्या समीकरणांमुळे सोशल मिडियात नेत्यांची जोरदार खिल्ली उडविली जात आहे. सोनिया गांधी यांना विदेशातील जन्मावरून विरोध करणाऱ्या शिवसेनेला त्यांच्याकडे आता पाठिंब्याची विनंती करण्याची वेळ आली.
इटलीच्या मॅडम होणार आता वाघांची मावशी!

नवी दिल्ली : काॅंग्रेसच्या निर्णयाची राष्ट्रवादी काॅंग्रेसला प्रतिक्षा असून, त्यानंतरच शिवसेनेला पाठिंबा द्यायचा की नाही, हे जाहीर होणार असल्याचे राष्ट्रवादी काॅंग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी स्पष्ट केले आहे. दोन्ही काॅंग्रेसने एकत्र निवडणुका लढविल्या असल्याने सरकार स्थापनेचा निर्णयही एकत्रित घेतला जाणार असल्याचे शरद पवार यांनीही या आधी जाहीर केले होते. यावर सोशळ मिडियात जोरदार प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

काॅंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया या गांधी पुन्हा किंगमेकरच्या भूमिकेत आल्या आहेत. महाराष्ट्रात सत्तास्थापनेसाठी शिवसेनेला पाठिंबा देण्याचा निर्णय काँग्रेसने जवळपास पक्का केल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. याबाबत दुपारी चार वाजता आणखी एक बैठक होणार आहे.

आज सकाळी काँग्रेस वर्किंग कमिटी मिटिंग झाली. त्याबाबत माहिती देताना काँग्रेसचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जून खर्गे म्हणाले, " बैठकीत महाराष्ट्रातल्या परिस्थितीवर चर्चा झाली. पुढच्या निर्णयासाठी राज्यातल्या वरिष्ठ नेत्यांना बोलावले आहे. चार वाजता त्यांच्याशी चर्चा होणार आहे. त्यांच्याशी चर्चेनंतर निर्णय घेतला जाईल."

दरम्यान, काँग्रेसच्या बहुसंख्य आमदारांनी महाराष्ट्रात शिवसेनेला पाठिंबा देऊन सत्तेत सहभागी होण्यासाठी अनुकुलता दर्शवली आहे. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी ही योग्य संधी आहे आणि ती संधी घ्यावी, असे काँग्रेसच्या बहुतेक सर्व आमदारांचे म्हणणे आहे.

दरम्यान या साऱ्या घडामोडींवर सोशल मिडियात चर्चेला उधाण आले असून अनेकांनी तिरकसपणे त्यावर प्रहार सुरू केले आहेत. त्यातील एक कविता पुढे दिली आहे. कवीचे नाव माहीत नाही...

मातोश्रीवर लगीन घाई
बारामतीकर झाले हौशी
इटलीची मॅडम होणार म्हणे
आता वाघांची मावशी

उद्धव म्हणे सोनियाला
ओवाळ मला ताई
तुझ्या भाच्याला झाली
सीएम व्हायची घाई

धीर धर दादा
आता आदु होईल सीएम
पण राहुलला माझ्या तू
कधी करणार पीएम

धीर धर जरा तू 
प्रसंग आहे बाका
हे सगळे खेळ खेळतोय
बारामतीचा काका

.........

 नवीन उखाणा
"राष्ट्रवादी काँग्रेस चे देवेंद्र यांनी आमदार फोडले पंचवीस,
पवार साहेबांच्या नादी लागून घरी बसले फडणवीस"

........

एका दरोडेखोराने पाटणा, श्रीनगर,इंफाळ, पणजी,बंगलोर अशा अनेक ठिकाणी घरफोडी केल्या. वाटणी केली. 
मुंबईत आल्यावर दरोडेखोराला डाका घालता येईना. 
दरोडेखोर म्हणाला, "मी डाका घालण्यास असमर्थ आहे" 
टोळीतले लोक म्हणाले, "पहा दरोडेखोर किती प्रामाणिक आहे!"

........

देवेंद्र राजीनामा देऊन जाई नागपूरा
 तोची दिवस आम्हा दिवाळी, दसरा
       -  संत एकनाथ(खडसे)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com