नगर जिल्ह्याचा पालकमंत्रीही इकडे ठरला....

सरकार येण्याच्या आधीच नेत्यांचे समर्थक समीकरणे मांडू लागले आहेत...
नगर जिल्ह्याचा पालकमंत्रीही इकडे ठरला....

पुणे : शिवसेना, काॅंग्रेस, राष्ट्रवादी या तीन पक्षांच्या महाआघाडीच्या नुसत्या शक्यतेने अनेक पतंग उडू लागले आहेत. त्यात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री, अजित पवार हे उपमुख्यमंत्री, पृथ्वीराज चव्हाण हे विधानसभेचे अध्यक्ष अशी नावे चर्चेत आली आहेत. याशिवाय नगर जिल्ह्याचा पालकमंत्रीही सोशम मिडियात ठरवून टाकला आहे.

भाजपने सरकार बनवायला नकार दिल्यानंतर ही जबाबदारी आता शिवसेनेवर आली आहे. शिवसेनेला पाठिंबा द्यायचा की नाही, यावर दोन्ही काॅंग्रेसमध्ये खलबते सुरू आहेत. मात्र त्याआधी संभाव्य मंत्र्यांच्या नावांनी सोशल मिडियात धुमाकूळ घातला आहे.

यात नगर जिल्हा अग्रभागी आहे. भाजपची सत्ता आली असती तर राधाकृष्ण विखे पाटील हेच पालकमंत्री झाली असते. कारण या आधी पालकमंत्रीपद सांभाळणारे राम शिंदे यांचा पराभव रोहित पवार यांनी केला होता. आता शिवसेना महाआघाडीचे सरकार येणार असल्याची चर्चा सुरू जाल्याने साहजिकच नगरचा पालकमंत्री कोण होणार, यावर अनेकांनी आपापली मते व्यक्त केली आहेत. यात रोहित पवार यांच्या नावाची चर्चा स्वाभाविकपणे जोरात आहे.

काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात हे नगर जिल्ह्यातील नेते आहेत. काॅंग्रेस जर सत्तेत सहभागी झाली तर थोरात यांच्याकडे नगर जिल्ह्याचा कार्यभार येऊ शकतो. मात्र काॅंग्रेस बाहेरून पाठिंबा देणार असल्याची शक्यता असल्यास रोहित पवार हे नगरचे पालकमंत्री बनू शकतात.

नगर जिल्ह्यात राष्ट्रवादीचे कर्जत, राहुरी, पारनेर, अकोले, नगर, कोपरगाव असे सहा ठिकाणी आमदार आहेत. काॅंग्रेसचे दोन, भाजपचे तीन आणि एक अपक्ष आमदार आहे. यामुळे नगरचे पालकमंत्रीपद राष्ट्रवादीकडे जाऊ शकते. रोहित यांना भविष्यातील नेता म्हणून प्रोजेक्ट करण्यासाठी ही चांगली संधी असल्याने त्यांचा मंत्रिमंडळात समावेश होऊ शकतो, अशीही शक्यता नेटकरी व्यक्त करीत आहेत.   

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com