social media campaign on dr dabholkar murder | Sarkarnama

दाभोलकरांना न्याय कधी मिळणार?...'जबाब दो'! 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 1 ऑगस्ट 2018

व्टिटरवर #JawabDo, #WhoKilledDabholkar? 
हे हॅश टॅग वापरून व्हॉट्‌स ऍप, व्टीटर, फेसबूक, इंन्स्टाग्राम आणि इतर सोशल मिडियाच्या वेगवेगळ्या माध्यमातून सरकारला जाब विचारा, असे आवाहन डॉ. हमीद दाभोलकर यांनी केले आहे. 
 

सातारा : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्त्येला येत्या 20 ऑगस्टला पाच वर्षे पूर्ण होत आहेत. अद्यापही त्यांचे हल्लेखोर व या कटाचा मुख्य सूत्रधार पोलिसांना सापडलेले नाहीत. डॉ. दाभोलकरांना न्याय कधी मिळणार, हा प्रश्‍न सरकारला विचारण्यासाठी समितीच्यावतीने "जबाब दो'...कॅम्पेनिंग सुरू केले आहे. 

अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची पुण्यात 20 ऑगस्ट 2013 मध्ये अज्ञात मारेकऱ्यांकडून गोळ्या झाडून हत्या झाली होती. या घटनेला येत्या 20 ऑगस्टला पाच वर्षे पूर्ण होत आहेत. ज्यांनी आपले उभं आयुष्य जनमानसातील अंधश्रद्धा निर्मूलन करण्यासाठी आणि विवेकी समाज निर्माण करण्यासाठी वेचलं, त्यांच्यावर भर रस्त्यात हल्ला करून गोळ्या घातल्या गेल्या. गेल्या पाच वर्षात त्यांचे हल्लेखोर व त्यामागच्या मुख्य सूत्रधाराचा शोध तपासी यंत्रणेला लागलेला नाही. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना न्याय कधी मिळणार असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. यापार्श्‍वभूमीवर अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्यावतीने सोशल मीडियावरून सरकारला याचे उत्तर विचारण्यासाठी जबाब दो...हे कॅम्पेनिंग चालविले जात आहे. सोशल मिडियाच्या वेगवेगळ्या माध्यमातून सरकारला जाब विचारला जाणार आहे. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख