मुंबई पुणे एक्सप्रेसवे टोल वसुलीची निवृत्त न्यायाधीशांकडून चौकशी करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

विवेक वेलणकर यांनी माहिती अधिकार कायद्यांतर्गत केलेल्या तक्रारीची दखल घेऊन राज्य रस्ते विकास महामंडळाला (एमएसआरडीसी) सप्टेंबर 2015 पासून प्रत्येक टोल नाक्‍यावरून दरमहा धावणाऱ्या वाहनांची संख्या आणि जमा झालेल्या टोलची रक्कम याबाबतची माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार ही माहिती राज्य रस्ते विकास महामंडळाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध होत आहे. यातील तफावतीची चौकशी करण्याची मागणी वेलणकर यांनी केली आहे
Social Activist Demands Inquiry of Mumbai Pune Express Way Toll Collection
Social Activist Demands Inquiry of Mumbai Pune Express Way Toll Collection

मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील (एक्‍स्प्रेस वे) दोन कंत्राटदारांनी दिलेल्या टोल वसुलीच्या आकडेवारीत तफावत आहे. त्यामुळे या महामार्गावरील टोल वसुलीला सरकारने स्थगिती द्यावी, अशी मागणी सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष तथा माहिती अधिकार कार्यकर्ते विवेक वेलणकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

विवेक वेलणकर यांनी माहिती अधिकार कायद्यांतर्गत केलेल्या तक्रारीची दखल घेऊन राज्य रस्ते विकास महामंडळाला (एमएसआरडीसी) सप्टेंबर 2015 पासून प्रत्येक टोल नाक्‍यावरून दरमहा धावणाऱ्या वाहनांची संख्या आणि जमा झालेल्या टोलची रक्कम याबाबतची माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार ही माहिती राज्य रस्ते विकास महामंडळाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध होत आहे. जुन्या कंत्राटदाराने दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल ते जुलै 2019 या चार महिन्यांत मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर एक कोटी 72 लाख 50 हजार 391 वाहने धावली. त्याची सरासरी दरमहा 43 लाख वाहने अशी आहे. 

यामध्ये टोल न भरलेल्या वाहनांची संख्याही समाविष्ट असल्याचे कंत्राटदाराने नमूद केले. दरम्यान, या कालावधीत सरासरी दरमहा 60 कोटी रुपये टोलवसुली होत असल्याचे सांगितले. नव्या कंत्राटदाराने सादर केलेल्या आकडेवारीनुसार, सप्टेंबर महिन्यात 16 लाख 90 वाहने धावली असून, त्यातून 59 कोटी 70 लाख रुपयांचा टोल वसूल झाला आहे; तर ऑक्‍टोबर महिन्यात 19 लाख वाहने धावली आणि 67 कोटी रुपये टोल जमा झाला, तर नोव्हेंबर महिन्यात 19 लाख 34 हजार वाहने धावली असून 71 कोटी रुपये टोल जमा झाल्याचे दाखवले आहे. विशेष म्हणजे या दोन कंत्राटदारांनी दाखवलेल्या वाहनसंख्येत तिपटीचा फरक आहे. नव्या कंत्राटदाराने कमी वाहनसंख्या दाखवून 15 टक्के जास्त टोल जमा झाल्याचे दाखवले. नवीन कंत्राटदाराच्या वाहनसंख्या आणि जमा टोल रक्कम यामध्येही तीन महिन्यांत तफावत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com