इंदोरीकर महाराज प्रकरणी टीकाकारांनी शब्द धरून बसू नये - सिंधूताई सपकाळ

""कीर्तनकार निवृत्ती देशमुख इंदोरीकर महाराज यांनी आजवर केलेल्या चांगल्या कामाकडे दुर्लक्ष करायचे का? एखादा शब्द नकळत बोलून गेले, तर त्याचे एवढे भांडवल कशासाठी? त्यांचे कार्य चांगले आहे, ते त्यांनी जोमाने सुरू ठेवावे. टीकाकारांनी शब्द धरून न बसता वादावर पडदा टाकावा,'' अशा शब्दांत सिंधूताई सपकाळ यांनी कीर्तनकार इंदोरीकर महाराजांचे समर्थन केले.
social activist sindhutai sapkal backs marathi preacher indorikar maharaj
social activist sindhutai sapkal backs marathi preacher indorikar maharaj

शिर्डी : ""कीर्तनकार निवृत्ती देशमुख इंदोरीकर महाराज यांनी आजवर केलेल्या चांगल्या कामाकडे दुर्लक्ष करायचे का? एखादा शब्द नकळत बोलून गेले, तर त्याचे एवढे भांडवल कशासाठी? त्यांचे कार्य चांगले आहे, ते त्यांनी जोमाने सुरू ठेवावे. टीकाकारांनी शब्द धरून न बसता वादावर पडदा टाकावा,'' अशा शब्दांत सिंधूताई सपकाळ यांनी कीर्तनकार इंदोरीकर महाराजांचे समर्थन केले.

कोऱ्हाळे येथील श्री गणेश शिक्षण संस्थेच्या वार्षिक स्नेहसंमेलनात त्या बोलत होत्या. संस्थेचे अध्यक्ष विजय शेटे उपस्थित होते. सिंधूताई म्हणाल्या, "इंदोरीकर महाराजांचे कार्य मोठे आहे. त्यांनी प्रबोधनाच्या माध्यमातून तरुणांना वाईट मार्गापासून परावृत्त केले. त्यांच्या आजवरच्या कष्टावर पाणी फिरवून कसे चालेल? एखादा शब्द नकळत बोलून गेले तर तेच धरून कसे चालेल? त्यांचे कार्य चांगले आहे. समाजाला प्रबोधनाची गरज आहे. आपली संस्कृती तुकोबांची आहे. कष्टाला सर्वाधिक महत्त्व आहे. मुलींनी अंगभर कपडे घालावेत. आपल्या संस्कृतीची जाण ठेवावी. ही उघडी संस्कृती कोठून आली?'' 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com