नगर : सार्वजनिक विवाह सोहळा आयोजित करून सर्वधर्मियांना संधी देत कोल्हे कुटुंबियांनी कन्यादान केले. तब्बल ४१ जोडप्यांच्या भाजपच्या आमदार स्नेहलता कोल्हे वरमाई झाल्या. मंगलाष्टके सुरू असताना त्यांनी स्वतः तुळशीला पाणी घातले.
आमदार कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संजीवनी औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष युवा नेते संजीवनी युवा फाउंडेशनचे सर्वेसर्वा विवेक कोल्हे यांच्या प्रमुख नेतृत्त्वाखाली सर्वधर्मियांचा सामुदायिक विवाह सोहळा आज कोपरगावला झाला.
४१ जोडप्यांच्या या विवाहासाठी सर्व वऱ्हाडीमंडळींची व्यवस्था अत्यंत चोख करण्यात आली होती. सर्वांना नाष्ता, चहा, जेवण, शाही मिरवणूक, डोली बाजा असा डामडौल होता. फटाक्यांची अतिषबाजी तसेच विवाहासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व वस्तू या दाम्पत्यांना देण्यात आल्या होत्या.
या सोहळ्याला शुभाशिर्वाद देण्यासाठी तालुक्यातील सर्व मोठे नेते, नगरसेवक, व्यापारी, अभियंते, डाॅक्टर्स तसेच पंचक्रोशितील नागरिक उपस्थित होते.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.