smruti irani minister in center | Sarkarnama

आजचा वाढदिवस : स्मृती इराणी, केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री, माहिती आणि प्रसारण मंत्रालय (अतिरिक्त जबाबदारी)

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 23 मार्च 2018

स्मृती इराणी यांनी 2003 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. 2010 मध्ये त्यांची भाजपच्या राष्ट्रीय सचिवपदावरही निवड झाली होती. 2004 मध्ये लोकसभा निवडणुकांमध्ये दिल्लीच्या चांदणी चौक मतदारसंघामधून त्यांनी कॉंग्रेसच्या कपिल सिब्बल यांच्या विरुद्ध निवडणूक लढवली होती. 2014 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांनी अमेठीमधून राहुल गांधी यांच्याविरुद्ध निवडणूक लढवली होती; पण त्यात त्यांचा पराभव झाला. त्या गुजरातमधून भाजपकडून राज्यसभेवर निवडून आल्या. नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये स्मृती इराणी यांना वस्त्रोद्योग निर्माण खाते दिले आहे.

स्मृती इराणी यांनी 2003 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. 2010 मध्ये त्यांची भाजपच्या राष्ट्रीय सचिवपदावरही निवड झाली होती. 2004 मध्ये लोकसभा निवडणुकांमध्ये दिल्लीच्या चांदणी चौक मतदारसंघामधून त्यांनी कॉंग्रेसच्या कपिल सिब्बल यांच्या विरुद्ध निवडणूक लढवली होती. 2014 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांनी अमेठीमधून राहुल गांधी यांच्याविरुद्ध निवडणूक लढवली होती; पण त्यात त्यांचा पराभव झाला. त्या गुजरातमधून भाजपकडून राज्यसभेवर निवडून आल्या. नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये स्मृती इराणी यांना वस्त्रोद्योग निर्माण खाते दिले आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालय खात्याची अतिरिक्त जबाबदारीही त्यांना देण्यात आलेली आहे. राजकारणात सक्रिय होण्यापूर्वी त्या अभिनय, आणि मॉडेलिंग क्षेत्रात काम करत होत्या. 1997 फेमिना मिस इंडिया स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता. एकता कपूरच्या क्‍योंकी सास भी कभी बहू थी ह्या मालिकेमध्ये आघाडीची भूमिका मिळाली. सदर भूमिकेमुळे त्यांची घराघरात ओळख निर्माण झाली. ह्या भूमिकेसाठी त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. या व्यतिरिक्त त्यांनी आतिश, थोडीसी जमीन थोडासा आसमॉं, रामायण या मालिकांमध्येही भूमिका आहेत. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख