#JantaCurfew स्मृती ईराणींनी सुरु केली ट्वीटर अंताक्षरी!

जनता कर्फ्यूमध्येकाय करायचे हा प्रश्न केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी यांनी आपल्या पुरता सोडवला आहे. त्यांनी सकाळपासून ट्वीटरवर अंताक्षरी सुरु केली आहे
Smriti Irani Started Twitter antakshari
Smriti Irani Started Twitter antakshari

पुणे : कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता कर्फ्यूचे आवाहन केले आहे. त्याला देशभरातूनभरभक्कम प्रतिसाद मिळाला आहे. आज सकाळी सात ते रात्री नऊ वाजण्याच्या मुदतीत सुरु असलेल्या या जनता कर्फ्यूमध्येकाय करायचे हा प्रश्न केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी यांनी आपल्या पुरता सोडवला आहे. त्यांनी सकाळपासून ट्वीटरवर अंताक्षरी सुरु केली आहे. त्याला ट्वीटकऱ्यांकडून भरभक्कम प्रतिसाद मिळत आहे. 

प्रख्यात निर्माता दिग्दर्शक करण जोहर यांच्या सारख्यांनीही या ट्वीटर अंताक्षरीच्या खेळात भाग घेतला आहे. काहींनी याउपक्रमावर टिकाही केली आहे. आजच्या गंभीर परिस्थितीला उद्देशूनही काहींनी आपल्या आवडीच्या गाण्यांच्या ओळी ट्वीटकेल्या आहेत. 'जिंदगी एक सफर है सुहाना...यहाँ कल क्या हो किसने जाना...' असे कुणी म्हणते आहे. तर कुणी 'जिंदगी हरकदम एक नयी जंग है' असे गाणे ट्वीट करत आजच्या लढ्याला बळ देत आहेत. यही कट जाएगा सफर साथ चलने से, की मंजिल आएगी नजर साथ चलने से...असे सांगत कुणी कोरोनाच्या लढ्यातला आशावाद जागवत आहेत. 

करण जोहरनेही आपल्या आवडीचे एक गाणे ट्वीट केले. 'लग जा गले की फीर ये हसीं रात हो न हो...' असे करण जोहरचेट्वीट पडले. पण कोरोनाच्या काळात हे गाणे चुकीचे आहे, असे सांगत स्मृती ईराणी यांनी त्याला उत्तर दिले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com