निष्ठावंत आहोत, म्हणूनच आमचा " कोल्ड मर्डर ' : स्मिता वाघ

 निष्ठावंत आहोत, म्हणूनच आमचा " कोल्ड मर्डर ' : स्मिता वाघ

जळगाव : भारतीय जनता पक्षात आम्ही चाळीस वर्षापासून काम करीत आहोत, निष्ठेने काम करीत आहोत, परंतु एबी फॉर्मसह अर्ज भरलेला असतांना आमचे तिकीट कापून चार वर्षापूर्वी पक्षात आलेल्यांना उमेदवारी देण्यात आली. आमचा हा "कोल्ड मर्डर'च आहे. तरीही आम्ही पक्षाने दिलेल्या उमेदवाराचा निष्ठेने प्रचार करणार आहोत. असे मत जळगाव लोकसभा मतदार संघातील भाजपच्या तिकीट रद्द केलेल्या उमेदवार स्मिता वाघ यांनी पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केले. 

जळगाव लोकसभा मतदार संघातील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार आमदार स्मिता वाघ यांची उमेदवारी रद्द करून पक्षाने चाळीसगावचे आमदार उन्मेश पाटील यांना उमेदवारी दिली आहे. पाटील आज उमेदवारी अर्ज दाखल करीत आहेत. पक्षाने घेतलेल्या या निर्णयाबाबत आमदार स्मिता वाघ यांचे समर्थक नाराज झाले आहेत. जळगावात त्यांच्या निवासस्थानी जळगाव लोकसभा मतदार संघातील कार्यकर्ते जमले होते. त्यांनी पक्षाच्या या निर्णयाविरोधात प्रचंड रोष व्यक्त केला. निष्ठेने कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना हेच फळ काय ? असे मतही कार्यकर्त्यानी व्यक्त केले. 

यावेळी बोलतांना आमदार स्मिता वाघ म्हणाल्या, मी पक्षाची निष्ठावंत कार्यकर्ती आहे. गेल्या चाळीस वर्षे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेपासून आपण कार्य करीत आहोत. पक्षाने आपल्याला लोकसभेची उमेदवारी दिली, अर्ज दाखल करून आपण प्रचारास सुरुवातही केली होती. तब्बल शंभर गावे आपण प्रचार केला, प्रत्येक घरी भेट दिली, आणि आता आपल्याला पक्षाने उमेदवारी रद्द केल्याचे कळविले आहे. आपल्याला उमेदवारी नाकारल्याचे वाईट वाटत नाही परंतु ज्या पध्दतीने ते नाकारण्यात आले आहे. त्याचे वाईट वाटते.आम्ही निष्ठावान आहोत, त्यामुळेच पक्षाने आमची उमेदवारी कापली आहे, अशी आमची खात्री झाली आहे. 

अगोदरच नकार दिला असता तर वाईट वाटले नसते. आमचा अगदी "कोल्ड मर्डर'करण्यात आला आहे. तरीही आपण पुढे पक्षाने दिलेल्या अधिकृत उमेदवाराचा प्रचार करणार आहोत. यावेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष व स्मिता वाघ यांचे पती उदय वाघ यांनीही नाराजी व्यक्त केली. आमची उमेदवारी का रदद करण्यात आली याची कारणे आम्हाला सांगण्यात आलेली नाहीत ती आम्हाला हवी आहेत. मात्र आमचा उमेदवारीसाठी आग्रह कायम असणार आहे. नाही दिली तरीही आम्ही नाराज न होता. पक्षाचे निष्ठने काम करणार आहोत. यावेळी जिल्हा परिषद शिक्षण समिती सभापती पोपट तात्या भोळे, पी.सी.आबा पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष उज्वला पाटील यांचे पती मच्छिंद्र पाटील,तसेच त्यांच्या अमळनेर मतदार संघातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com