शहरी माओवादी अतिशय धोकादायक - स्मिता गायकवाड

 शहरी माओवादी अतिशय धोकादायक - स्मिता गायकवाड

नाशिक : शहरात सामाजिक कार्य करत आपली खरी ओळख लपवून माओवाद रुजविण्यासाठी काही उच्चशिक्षित, बुद्धिवादी प्रयत्नशील असतात. अशा प्रकारचे शहरी माओवादी समाजासाठी अतिशय धोकादायक आहेत. ते एकप्रकारे फोर्थ जनरेशन युद्धनीतीचा वापर करत असतात असे प्रतिपादन कॅप्टन (निवृत्त) स्मिता गायकवाड यांनी येथे केले. येथील सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीतर्फे धर्मवीर डॉ. बा. शि. मुंजे व्याख्यानमालेत " माओवाद आणि अंतर्गत सुरक्षा' या विषयावर त्यांचे व्याख्यान झाले. कॅप्टन गायकवाड म्हणाल्या, की माओवादी लोक समाजातील दलित, अल्पसंख्याक आणि आदिवासी लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी लढत असल्याचे सांगत आहेत. मुळात ते या देशातील लोकशाहीच उलटून टाकण्यासाठी प्रयत्नशील आहे. भविष्याचा विचार नसलेली स्वतःची लोकशाही आणण्यासाठी लढत आहे. माओवादी सत्ता, हेच एकमेव त्यांचे उद्दिष्ट आहे. 

जंगलात वाढलेला माओवाद आता शहरात पाय पसरू लागला आहे. 2010 मध्ये केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांनी याबाबत लोकसभेत भाष्य करताना शहरी माओवाद घातक असल्याचे सांगितले होते. माओवादी संघटनांशी संलग्न असलेले शहरातील उच्चशिक्षित आणि बुद्धिवादी लोक विविध प्रकारची माध्यमे वापरून सामान्य लोकांच्या मनावर ताबा मिळवित असून, त्यांना शस्त्र नसलेल्या सैनिकासारखे वापरण्याचा प्रयत्न करत आहे. ती वाढू लागली असून, त्याचे उदाहरण म्हणजे कोरेगाव भीमा दंगल. माओवादी संविधानविरोधी असतो. कोणताही आंबेडकरवादी संविधानविरोधी नसतो. त्यामुळे माओवादी हे आंबेडकरवादी नसल्याचे त्यांनी सांगितले.महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स आणि ऍग्रिकल्चरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा, संस्थेचे कार्यकारिणी सदस्य प्रकाश पाठक आदी उपस्थित होते. प्रा. रोहिणी कुरुंदकर यांनी संचालन केले. 


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com