बाळासाहेब ठाकरे यांचे 'स्मार्ट' प्रकल्पास नाव; जागतिक बॅंकेच्या अर्थसहाय्यातून कृषीच्या योजना

जागतिक बॅंक अर्थसहाय्यित महाराष्ट्र राज्य कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प (स्मार्ट) राज्यात राबवण्यात येणार आहे. त्यास शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा निर्णय कृषी मंत्रालयाने घेतला आहे
SMART Project will be given Balasaheb Thackerays Name
SMART Project will be given Balasaheb Thackerays Name

नाशिक : जागतिक बॅंक अर्थसहाय्यित महाराष्ट्र राज्य कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प (स्मार्ट) राज्यात राबवण्यात येणार आहे. त्यास शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा निर्णय कृषी मंत्रालयाने घेतला आहे. हा प्रकल्प आता बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प या नावाने राबवण्यात येईल. प्रकल्पातंर्गत 300 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच, 2 हजार 100 कोटींची गुंतवणूक अपेक्षित आहे.

प्रकल्पासाठी जागतिक बॅंकेकडून 210 दशलक्ष डॉलर्स इतके कर्ज घेण्यात येणार आहे. प्रकल्पातून राज्यातील विविध पिकांच्या कार्यक्षम मूल्य साखळ्या विकसित करण्यात येणार आहेत. त्यात संघटीत शेतकऱ्यांचा सहभाग वाढवण्यासाठी, सरकारी योजना-प्रकल्पांच्या माध्यमातून यापूर्वी संघटीत केलेल्या शेतकऱ्यांच्या शेतमालावर प्रक्रिया करुन तो थेट खासगी उद्योजकांना विक्रीसाठी बाजार जोडणी व्यवस्था करण्याचा सरकारचा मानस आहे. 9 सप्टेंबर 2019 च्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रकल्पास मान्यता देण्यात आली. त्यासंबंधीचे आदेश 11 सप्टेंबर 2019 ला जारी झाले. तसेच संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. 15 जानेवारी 2020 च्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सप्टेंबरमधील मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या इतिवृत्तास मान्यता देण्यात आली आहे.

प्रकल्प कक्ष स्थापन

प्रकल्पाचा आराखडा तयार करण्यासाठी कृषी आयुक्तांच्या अधिपत्याखाली 37 अस्थायी पदांसह प्रकल्प व्यवस्थापन कक्ष स्थापन करण्यात आला आहे. राज्यस्तरावरुन प्रकल्पाचे संनियंत्रण करण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली प्रकल्प सुकाणू समिती स्थापन करण्यात आली आहे. शिवाय प्रकल्प व्यवस्थापन कक्षासाठी उच्चस्तर सचिव समितीच्या मान्यतेने 37 अस्थायी पदांची निर्मिती करण्यात आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com