सचिवांच्या आडमुठेपणामुळे कौशल्य शिक्षणाचा बोजवारा

कौशल्य विकास खात्याचे काम कुशलतेने लटकवण्याचे सचिवांचे कौशल्य सध्या मंत्रालयात चर्चेचा विषय बनला आहे .
mantralaya
mantralaya

मुंबई : देशभरातील तरूणांना रोजगारक्षम बनविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी `स्कीलिंग इंडिया` (कौशल्यपूर्ण भारत) सारख्या मोहिमा हाती घेतल्या आहेत. पण महाराष्ट्रात मात्र कौशल्य शिक्षणाचा वारू या खात्याचे
प्रधान सचिव दीपक कपूर यांच्या कार्यालयात अडल्याचे विश्वसनीय सूत्रांनी `सरकारनामा`शी बोलताना सांगितले.

दीपक कपूर यांना आपल्या कार्यालयात कोणीही आलेले आवडत नाही. विशेष म्हणजे, त्यांच्या खात्यातील उपसचिव, कक्ष अधिकारी, कौशल्य शिक्षण मंत्र्यांच्या कार्यालयातील अधिकारी, व्यावसाय शिक्षण व प्रशिक्षण
संचालनालयातील अधिकारी अशा कोणीही कार्यालयात यायचे नाही, अशी तंबीच कपूर यांनी दिली आहे.

त्यामुळे एखादा महत्त्वाचा विषय सुद्धा कपूर यांना सांगता येत नाही, असे या खात्यातील काही अधिका-यांनी सांगितले.दुस-या बाजूला ते कामातही अतिशय संथ आहेत.  त्यांच्याकडे गेलेली फाईल किमान सहा महिने मंजूर होत नाही. त्यामुळे `स्कीलिंग इंडिया`च्या तिनतेरा वाजल्या आहेत.

जागतिक बँकेने निधी पुरवठा केलेली एक योजना कपूर यांच्या अनास्थामुळे अद्याप मार्गी लागलेली नाही. राज्यातील विविध आयटीआय संस्थांतील वाढील
1500 तुकड्यांना केंद्र सरकारच्या `राष्ट्रीय व्यावसाय शिक्षण व प्रशिक्षण परिषदे`ची (एनसीव्हीटी) संलग्नता देण्याचा विषय प्रलंबित आहे.

त्यासाठी संबंधित संस्थांमध्ये पायाभूत सुविधांची तजवीज करणे, शिक्षकांच्या नियुक्त्या करणे गरजेचे आहे. पण हा विषय मार्गी लावण्यातही कपूर दुर्लक्ष करीत आहेत, असे या सूत्रांनी सांगितले.

पंतप्रधानांची `स्किलिंग इंडीया` ही संकल्पना तळागाळात पोचविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कौशल्य शिक्षण मंत्री संभाजी पाटील - निलंगेकर हे कमालीचे प्रयत्न करीत आहेत. पण सचिव कपूर यांच्या संथ कारभारामुळे हे खाते अद्याप फार प्रभाव पाडू शकले नसल्याची खंत अधिकारी व्यक्त करीत आहेत.

याबाबत संभाजी पाटील निलंगेकर यांच्याशी संपर्क साधला असता, कपूर यांच्याबाबत माझा व्यक्तीगत अनुभव चांगला आहे, असे ते म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com