शिवसेना आमदार योगेश घोलपांच्या देवळालीत भाजपच्या १६ इच्छुकांनी मागीतली उमेदवारी

गेली तीस वर्षे देवळाली मतदारसंघ शिवसेनेकडे आहे. यंदा मात्र मोठ्या प्रमाणात अँटी इनकमबन्सीचा असल्याचा दावा करीत भाजपकडे पाच नगरसेवकांसह तब्बल सोळा इच्छुकांनी उमेदवारी मागीतली आहे. इच्छुकांनी एकमुखाने युती नको, यंदा भाजपचा उमेदवार द्या. आम्ही हमखास निवडून आणतो, असा दावा केला. सहकारी पक्षाच्या या भूमिकेने शिवसेनेत मात्र नाराजीचे चित्र आहे.​
Yogsh Gholap Shivsena Deolali Constituency
Yogsh Gholap Shivsena Deolali Constituency

देवळाली : गेली तीस वर्षे देवळाली मतदारसंघ शिवसेनेकडे आहे. यंदा मात्र मोठ्या प्रमाणात अँटी इनकमबन्सीचा असल्याचा दावा करीत भाजपकडे पाच नगरसेवकांसह तब्बल सोळा इच्छुकांनी उमेदवारी मागीतली आहे. इच्छुकांनी एकमुखाने युती नको, यंदा भाजपचा उमेदवार द्या. आम्ही हमखास निवडून आणतो, असा दावा केला. सहकारी पक्षाच्या या भूमिकेने शिवसेनेत मात्र नाराजीचे चित्र आहे. 

भारतीय जनता पक्षाने नुकत्याच इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. यावेळी उमेदवारी मागण्यासाठी ज्यांना पक्षातही कोणी ओळखत नाही, अर्ज कसा भरावा याचीही माहिती नसलेले अनेक 'हौशे' होते. हे सर्व अन्य उमेदवाराचा अर्ज घेऊन त्याची कॉपी करीत असल्याचे चित्र पहायला मिळाले. या इच्छुकांत प्रबळ दावेदार सरोज बाबुलाल अहिरे, शरद मोरे, श्‍याम बडोदे, भगवान दोंदे आणि अंबादास पगारे हे पाच नगरसेवक होते.

कॅन्टोनमेंट बोर्ड सदस्या प्रितम दिनकर आढाव या देखील इच्छुक आहेत. यातील सरोज अहिरे आणि प्रितम आढाव यांनी फलक लावून प्रचारालाही सुरवात केली आहे. याशिवाय कन्हैय्या साळवे हे माजी नगरसेवक आहेत. माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांच्या उपस्थितीत शक्ती केंद्र, बुथ प्रमुखांचा मेळावा झाला. त्याला मात्र केवळ सरोज अहिरे, प्रितम आढाव, प्रा. वाघ आणि श्री. साळवे एव्हढे चारच इच्छुक उपस्थित होते. या सर्वांनी एकमुखाने यंदा भाजपने उमेदवार द्यावा. आम्ही तो निवडून आणू, अशी मागणी केली. 

यातील काही इच्छुकांनी वरिष्ठ नेत्यांची भेट घेऊन उमेदवारी व देवळाली मतदारसंघाची मागणी केली. काही इच्छुकांनी आज आपल्या समर्थकांसह मुंबईत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली. 'दादा, देवळालीत उमेदवार द्या, आम्ही निवडून आणतो' अशी मागणी यावेळी करण्यात आली. देवळालीत शिवसेनेत आमदार घोलप हे एकमेव उमेदवार आहेत. अन्य कोणी उमेदवारीची मागणीही केलेली नाही. मात्र, युतीतील सहकारी पक्ष भाजपच्या इच्छुकांनी घुडग्याला बाशींग बांधल्याने शिवसेनेच्या मार्गात सहकारी पक्षाचेच अडथळे निर्माण झाले आहेत. युतीची घोषणा झाल्याशिवाय त्यावर उपाय योजना होण्याची शक्‍यता दिसत नाही. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com