शिरोळला सहा टन खाद्यपदार्थ हेलिकॉप्टरद्वारे पोच 

शिरोळला सहा टन खाद्यपदार्थ हेलिकॉप्टरद्वारे पोच 

कोल्हापूर : शिरोळ तालुक्‍याला काल लष्कराच्या हेलिकॉप्टरद्वारे सहा टन खाद्यपदार्थ पोच करण्यात आले. यात दूध, बिस्किटे, औषधांसह जीवनावश्‍यक वस्तूंचा समावेश आहे. पूरग्रस्त भागात आकाशातून या खाद्यपदार्थांची फेकाफेकी न करता कुरुंदवाड व शिरोळमध्ये हेलिकॉप्टर उतरवून तेथील छावण्यांत साहित्य देण्यात आले.

कोल्हापुरातील लष्कर, नेव्ही व कोस्ट गार्डच्या सुमारे 40 हून अधिक बोटी शिरोळ तालुक्‍याकडे रवाना करण्यात आल्या होत्या. दरम्यान, तेथील विविध छावण्यांतील पूरग्रस्तांच्या खाण्या-पिण्याचा प्रश्‍न आज गंभीर बनला होता. त्यामुळे आज लष्कराच्या एका हेलिकॉप्टरच्या चार फेऱ्यांद्वारे तब्बल सहा टन खाद्यपदार्थ तालुक्‍याला पाठविण्यात आले. यात ताज्या जेवणाबरोबरच बिस्किटाचे पुडे, दुधाची पॅकेट्‌स, औषधे, जनावरांसाठी अल्प चारा व अत्यावश्‍यक अशा खाद्यपदार्थांचा समावेश आहे. एका फेरीत साधारण दीड टन साहित्य पाठविण्यात आले. अशा चार फेऱ्या सायंकाळपर्यंत करण्यात आल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com