उद्धव ठाकरे किती श्रीमंत आहेत हे गुपित सहा महिन्यात सर्वांना कळणार 

ते माहीम मतदारसंघातून निवडणूक लढण्याची शक्‍यता आहे. ही निवडणूक लढताना त्यांना प्रतिज्ञापत्रावर संपत्ती जाहीर करावी लागणार आहे.
uddhav_thakre
uddhav_thakre

मुंबई : शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांना सहा महिन्यांत विधिमंडळाचे सदस्य व्हावे लागणार आहे. त्यामुळे त्यांना आपली संपत्ती जाहीर करावी लागणार आहे. उद्धव ठाकरे  किती श्रीमंत आहेत  हे  सहा महिन्यात जगजाहीर होणार  आहे.

शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी विधानसभेची निवडणूक लढवताना 16 कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर आता उद्धव ठाकरे आज  मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. यानंतर त्यांना सहा महिन्यांत विधानसभा किंवा विधान परिषदेचे सदस्य व्हावे लागेल.

ते माहीम मतदारसंघातून निवडणूक लढण्याची शक्‍यता आहे. ही निवडणूक लढताना त्यांना प्रतिज्ञापत्रावर संपत्ती जाहीर करावी लागणार आहे.

खासदार नारायण राणे यांनी शिवसेना सोडल्यानंतर शिवसेनेवर आरोप केले होते. त्यात संपत्ती जाहीर करावी लागेल म्हणून ठाकरे निवडणूक लढवत नाहीत, असा आरोप त्यांनी केला होता. त्यानंतर ठाकरे यांची नेमकी संपत्ती किती, याबाबत चर्चा सुरू झाली होती; मात्र आता लवकरच ठाकरे यांच्या संपत्तीबाबतचा तपशील समोर येणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com