विद्यमान शिवसेना आमदारांना मुलाखतीतून सूट, तिकिट कन्फर्म  !

मतदारसंघनिहाय सर्व इच्छूकांना एकत्रित न बोलवता प्रत्येकाची वीस ते पंचवीस मिनिट मुलाखत घेण्यात आली.
Gautam_Chabukswar.
Gautam_Chabukswar.

पिंपरीःविधानसभा इच्छूकांच्या मुलाखतीतून शिवसेनेने आपल्या राज्यातील सर्व विद्यमान आमदारांना सुट दिली आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवडमधील पिंपरीचे पक्षाचे आमदार अॅड. गौतम चाबूकस्वार हे मुलाखतीला काल मुंबईला जाऊनही मुलाखत  न देता परत आले. 

यामुळे आपलेच नाही,तर पक्षाच्या सर्वच आमदारांचे तिकिट कन्फर्म असल्याची प्रतिक्रिया त्यांनी यावर दिली. दरम्यान, मुलाखत घेणारे हे बहुतांश तरुण (त्यातही युवासेना) पदाधिकारी असल्याने तुलनेने अनुभवी असलेल्या आमदारांना मुलाखतीला बाय देण्यात आल्याची चर्चा मुलाखती नंतर ऐकायला मिळाली. पहिल्या दिवशीच्या मुलाखती घेणाऱ्या पथकात एक खासदार डॉक्टर आणि एक आमदार डॉक्टर होते.

दरम्यान,शहरातील तीनपैकी मतदारसंख्येत सर्वात लहान असलेल्या पिंपरी राखीव मतदारसंघात शिवसेनेकडून सर्वात कमी म्हणजे अवघे दोनच इच्छूक दिसून आले. त्यांनीच मुलाखती दिल्या.

त्यात नगरसेवक अॅड.सचिन भोसले आणि पुणे जिल्हा युवासेना समन्वयक व माजी नगरसेवक जितेंद्र ननावरे यांचा समावेश होता. ननावरे हे मावळचे शिवसेना खासदार श्रीरंगअप्पा बारणे यांचे कट्टर समर्थक आहेत. त्यांनीच ननावरेंना राष्ट्रवादीतून शिवसेनेत आणले आहे.

शिवसेनेच्या मुलाखतींना मंगळवारपासून मुंबईत शिवसेना भवनात सुरवात झाली. महसूल विभाग निहाय मुलाखती  झाल्या. पहिल्या दिवशी पश्चिम महाराष्ट्राच्या (पुणे विभाग) पाच जिल्ह्यातील (पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर) इच्छूकांच्या मुलाखती झाल्या.

मतदारसंघनिहाय सर्व इच्छूकांना एकत्रित न बोलवता प्रत्येकाची वीस ते पंचवीस मिनिट मुलाखत घेण्यात आली.  त्यात मतदारसंघाची स्थिती, निवडून कसे येणार आणि दुसऱ्याला उमेदवारी दिली, तर असे काही सामाईक प्रश्न प्रत्येक इच्छूकाला विचारण्यात आले. 

विश्वनाथ नेरूरकर, विजय कदम, डॉ. मनिषा कायंदे,डॉ.श्रीकांत शिंदे, प्रकाश फातर्फेकर, अमोल किर्तीकर आणि वरुण सरदेसाई या चमूने मुलाखती घेतल्या. 

विदर्भातील अमरावती, यवतमाळ, बुलढाणा, परभणी, बीड, नांदेड, हिंगोली, लातूर, धाराशीव (उस्मानाबाद) जिल्ह्यातील इच्छूकांच्या मुलाखती होत आहेत.  त्या खा. विनायक राऊत,खा, राहूल शेवाळे, आ. अंबादास दानवे, विनोद घोसाळकर, अमोल किर्तीकर, वरुण सरदेसाई घेत  आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com