Sister in Law of CM Uddhav Thackeray Injured in Accident | Sarkarnama

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मेव्हणीच्या मोटारीला अपघात

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 15 जानेवारी 2020

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मेहुणी वीणा कारंडे अपघातात जखमी झाल्या. शिर्डीहून दर्शन घेतल्यावर परतताना सिन्नर शिर्डी रस्त्यावर हा अपघात झाला

नाशिक : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मेहुणी वीणा कारंडे अपघातात जखमी झाल्या. शिर्डीहून दर्शन घेतल्यावर परतताना सिन्नर शिर्डी रस्त्यावर हा अपघात झाला.

श्रीमती कारंडे आपल्या तीन सहका-यांसह कालावधीत शिर्डीला गेल्या होत्या. रात्री परतीच्या प्रवासात चालकाला डुलकी लागली. शिर्डी-सिन्नर रस्त्यावर पांगरी गावाजवळ त्यांच्या मोटारीला अपघात झाला. कार एका लहान पुलावरून खाली कोसळली. यात तीन जखमी झाले. त्यांना नाशिकच्या अपोलो हाॅस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. 

या अपघातात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मेहुणी वीणा कारंडे यांच्यासह दोघेजण जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. तिघा जखमींना उपचारासाठी नाशिकच्या खासगी रुग्णालयात पोलिसांनी दाखल केलं. याबाबत तपास सुरु आहे. जखमींच्या प्रकृतीला धोका नाही, असे जिल्हा पोलिस अधीक्षक डाॅ आरती सिंग यांनी सांगितले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख