जितेंद्र आव्हाडांना मंत्रीमंडळात घेण्याची सिन्नरच्या नेत्यांची मागणी

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार व सिन्नरचे भूमीपूत्र डाॅ. जितेंद्र आव्हाड यांचा समावेश राज्याच्या मंत्रीमंडळात व्हावा अशी सिन्नरच्या राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांची मागणी आहेराष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश चिटणीस राजाराम मुरकुटे यांनी या संदर्भात त्यांनी प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांना निवेदन दिले आहे.
Sinner NCP Workers Want Jitendra Awhad in Maharashtra Ministry
Sinner NCP Workers Want Jitendra Awhad in Maharashtra Ministry

नाशिक : 'सिन्नरचे भूमीपुत्र असलेलेल आमदार डाॅ.जितेंद्र आव्हाड सलग तीनवेळा मोठ्या फरकाने विधानसभेवर निवडून आले आहेत. पुरोगामी विचारांशी बांधीलकी आणि पक्षाध्यक्ष शरद पवारांवर जीवापाड निष्ठा असणारे जितेंद्र आव्हाड यांना यंदा राज्याच्या मंत्रीमंडळात घ्यावे. त्याचा पक्षाच्या विस्ताराला मोठा उपयोग होईल,' अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश चिटणीस राजाराम मुरकुटे यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांना निवेदन दिले आहे.

या संदर्भात आपण विविध नेत्यांच्या भेटी घेणार असल्याचे त्यांनी सांगीतले. 'सिन्नरचे भूमीपुत्र असलेले आमदार आव्हाड 1996 पासून सक्रीय राजकारणात आहेत. ते अतिशय पुरोगामी विचाराचे आहेत. मात्र राजकीय तत्वांसाठी ते तेव्हढेच आक्रमक आहेत. शरद पवारांचे एकनीष्ठ, निकटवर्तीय अशी त्यांची प्रतिमा आहे. दोन वेळा विधान परिषदेवर तसेच तीन वेळा कळवा- मुंब्रा मतदारसंघातून 50 ते 80 हजार अशा मोठ्या मताधिक्‍याने ते विजयी झाले आहेत. राज्याचे नेते छगन भुजबळ, अजित पवार यांच्या एव्हढाच मतदारसंघातील जनतेचा त्यांना पाठींबा आहे. 2019 च्या निवडणुकीत त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी स्वतः शरद पवार तीन ते चार तास तळपत्या उन्हात उभे होते..' असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

महात्मा फुले, राजश्री शाहू आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेवर राजकारण करणाऱ्या आव्हाडांना मंत्रीमंडळात घ्यावे. सिन्नरसह राज्यातील पुरोगामी विचाराच्या कार्यकर्ते, नेत्यांची ही इच्छा असल्याचेही पत्रात म्हटले आहे. तालुक्‍यातील विविध कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनीही या मागणीला पाठींबा दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com