मी संकटग्रस्तांसाठी धावणारा कार्यकर्ताच राहीन : राजाभाऊ वाजे

सिन्नर मतदारसंघातील माजी आमदार वाजे यांची अत्यंत साधी राहणी, पारदर्शी कामकाज अन्‌ सतत लोकांत वावरणारा कार्यकर्ता अशी त्यांची कार्यकर्ते, मतदारांतील प्रतिमा.सिन्नर परिसरात महामार्गावर तसेच अन्य भागात अपघात झाल्यास ते सर्वात आधी मदतीला पोहचतात. अपघातग्रस्तांना मदत करण्याचा गेले वीस वर्षे त्यांचा हा उपक्रम सुरु आहे. तो त्यांनी पुन्हा एकदा जोमाने सुरु केला आहे
I Will Help Always To Those Who Are Needy Say Ex MLa Rajabhau Waje
I Will Help Always To Those Who Are Needy Say Ex MLa Rajabhau Waje

नाशिक : सिन्नर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे विद्यमान आमदार राजाभाऊ वाजे दोन हजारांच्या अल्पशः फरकाने पराभूत झाले. त्यांचा हा पराभव स्वतः वाजे यांच्यापेक्षा कार्यकर्त्यांना चटका लावून गेला. त्यांचे काम पुर्ववत सुरु आहे. ते म्हणाले, "मी आमदार असतांनाही कधी हाय फाय वागलो नाही. जो संकटात असेल त्यांच्या मदतीला सर्वप्रथम पोहोचणारा मी होतो. कालही होतो आजही तेच करीत. माझ्या कामात खंड पडलेला नाही.'' 

सिन्नर मतदारसंघातील माजी आमदार वाजे यांची अत्यंत साधी राहणी, पारदर्शी कामकाज अन्‌ सतत लोकांत वावरणारा कार्यकर्ता अशी त्यांची कार्यकर्ते, मतदारांतील प्रतिमा. निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर त्यांची विचारपुस करणाऱ्यांची रीघ होती. मात्र, त्यांनी लगेचच खासदार हेमंत गोडसे यांच्या समवेत अवर्षणग्रस्त भागाचा दौरा सुरु केला. सोनारी, सरदवाडी, कोनांबे परिसरातील शेतकऱ्यांची भेट घेऊन प्रशासनाकडे मदतीसाठी पाठपुरावा केला. राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस या तिन्ही पक्षांची महाविकास आघाडी सत्तेवर आली. त्याचा आनंदोत्सव त्यांनी साजरा करुन मिठाई वाटप केले. 

सिन्नर परिसरात महामार्गावर तसेच अन्य भागात अपघात झाल्यास ते सर्वात आधी मदतीला पोहचतात. अपघातग्रस्तांना मदत करण्याचा गेले वीस वर्षे त्यांचा हा उपक्रम सुरु आहे. तो त्यांनी पुन्हा एकदा जोमाने सुरु केला आहे. त्यामुळे रोजच गावात त्यांच्या कार्यालयाभोवती गर्दी असते. दोन दिवसांपूर्वी त्यांचा वाढदिवस झाला. यावेळी त्यांच्या समर्थकांनी रक्तदान करुन तो साजरा केला. सुमारे अडीचशे कार्यकर्त्यांनी रक्तदान केले. 

यावेळी ते म्हणाले, "मी साधा कार्यकर्ता आहे. निवडणुकीच्या निकालाने मला फारसा फरक पडलेला नाही. आमदार होतो तरी मी कधी हाय फाय वावरलो नाही. मला लोकांत राहण्याची, त्यांचे प्रश्‍न सोडविण्याची अन्‌ संकटग्रस्तांना मदत करण्याची आवड आहे. गेली अनेक वर्षे मी ते करीत आलो आहे. आजही करतो आहे. भविष्यात देखील त्यात खंड पडणार नाही.''

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com