आघाडी मिळूनही कोकाटे वंचित तर आमदार राजाभाऊ वाजे ठरले प्रभावी 

सिन्नरमध्ये पक्षीय विचार व्हीजिटींग कार्डपुरते मर्यादीत असतात. येथे गटाचे राजकारण चालते. सध्या येथे भाजपचे कोकाटे आणि शिवसेनेचे आमदार राजाभाऊ वाजे हे दोन गट आहेत. विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती यामध्ये कोकाटे यांची पिछेहाट झाली होती. वाजे गटाच्या शीतल सागळे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आहेत.
आघाडी मिळूनही कोकाटे वंचित तर आमदार राजाभाऊ वाजे ठरले प्रभावी 

नाशिक : नाशिक लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे हेमंत गोडसे विजयी झाले. त्यात सिन्नर विधानसभा मतदारसंघात 1.94 लाख मतदान झाले. यामध्ये 'सिन्नरकर' म्हणून भाजपचे बंडखोर माणिकराव कोकाटे यांना 91,114 अशी 46 टक्के मते मिळाली. त्यांना येथे गोडसेंच्या तुलनेत 34,438 मतांची आघाडी होती. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे समीर भुजबळ येथे 30,942 (15.91 टक्के) मते घेऊन तिसऱ्या क्रमांकावर होते. वंचित बहुजन आघाडीला 9095 अशी 4.67 टक्के मते मिळाली. कोकाटे आघाडीवर असले तरी त्यांना येथे लाखाहून अधिक मते अपेक्षीत होती. ती मिळाली नाहीत. शिवसेनेचे आमदार राजाभाऊ वाजे यांच्या यशस्वी मॅनेजमेंटने कोकाटे आणि भुजबळ या दोघांचेही गणित फिसकटले. 

सिन्नरमध्ये पक्षीय विचार व्हीजिटींग कार्डपुरते मर्यादीत असतात. येथे गटाचे राजकारण चालते. सध्या येथे भाजपचे कोकाटे आणि शिवसेनेचे आमदार राजाभाऊ वाजे हे दोन गट आहेत. विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती यामध्ये कोकाटे यांची पिछेहाट झाली होती. वाजे गटाच्या शीतल सागळे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आहेत.

या स्थितीत भविष्यात विधानसभा निवडणुकीत शिवसेना, भाजपची युती अटळ असल्याने कोकाटे यांच्या राजकारणाचा मार्ग बंद झाला होता. ते दार किलकिले करण्यासाठी ते लोकसभेच्या निवडणूकीत उतरले. त्यांच्यासाठी अडीच हजार कार्यकर्ते स्वखर्चाने मतदारसंघातील विविध गावांत तळ ठोकुन होते.

नाते-गोते, सगे- सोयरे, विविध संघटना या माध्यमातून त्यांनी मतदारांपर्यंत प्रचार पोहोचवला. तो प्रस्थापित राजकीय पक्षांच्या तोडीचा होता. मात्र त्यांना मिळालेली मते पाहता लोकसभा, विधानसभा निवडणूकांत अपक्षांची मतदार दखल घेत नाहीत यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे. त्यामुळे विधानसभेत जायचे तर त्यांनी शिवसेना, भाजप विरोधातील राजकीय पक्षात प्रवेश करणे एव्हढाच पर्याय राहतो. राष्ट्रवादी कॉंग्रेस हा एकमेव पर्याय सध्या तरी त्यांच्यापुढे शिल्लक असल्याचे वाटते. 

सिन्नरला मराठा विरुध्द वंजारी अशी सामाजिक राजकारणाची विभागणी आहे. कोकाटे यांच्या उमेदवारीमुळे वंजारी मते एकतर्फी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे समीर भुजबळ यांच्याकडे जातील असा अंदाज होता. मात्र आमदार वाजे आणि उदय सांगळे यांनी व्यक्तीगत कौशल्य पणाला लावून वंजारी समाजाची बरीच मते शिवसेनेकडे वळविली. त्यामुळेच गोडसे दुसऱ्या क्रमांकावर राहिले.

सिन्नरचा उमेदवार म्हणून येथे कोणत्याही प्रचाराशिवाय कोकाटे यांच्या बाजुने कल होता. त्यानुसार त्यांना सिन्नरमध्ये दिड लाख मेत अपेक्षीत होती. त्यात मोठी घट झाली. यामध्ये वाजे गटात नव्या नेतृत्वाची घुमारे फुटु लागल्याचा वास येतो आहे. पुन्हा एकदा सिन्नरला वंजारी समाजाकडे नेतृत्व यावे यादृष्टीने उदय सांगळे सक्रीय होण्याची चिन्हे आहेत. लोकसभा निवडणुकीत हेमंत गोडसे यांना वाढलेली मतांची आघाडी त्यातुन झाल्याचे बोलले जाते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com